Headlines

FD Highest Interest Rate Banks ; व्याजदर 8% हून जास्त, जाणून घ्या सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँका कोणत्या? ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सवलती


देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या देखभालिकरीता विविध योजना अमलात आहेत. जर ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही जोखमीशिवाय गुंतवणूक करायची आहे, तर फिक्स्ड डिपॉझिट हा पर्याय सगळ्यात सोयीस्कर आहे. देशातील अनेक वयोवृद्ध व्यक्तींकडून अशा प्रकारची गुंतवणूक कालांतराने होत आहे. सगळ्यात विशेष म्हणजे ग्राहकांना मोठ्या संख्येने आकर्षित करण्यासाठी विविध बँकांकडून फिक्स्ड डिपॉझिटवर चांगला व्याजदर दिला जात आहे. या व्याजदराकडे पाहून अनेक गुंतवणूकदार सुरक्षिततेसाठी फिक्स्ड डिपॉझिट या पर्यायाची निवड करत आहेत.

मुळात, SBI, HDFC, ICIC सारख्या मोठ्या सर्वसाधारण बँकांपेक्षा स्मॉल फायनान्स बँक फिक्स्ड डिपॉझिटवर जास्त व्याजदर देतात. शेतकरी, छोटे उद्योजक तसेच कमी उत्पन्न असणाऱ्या ग्राहकांसाठी आरबीआयने स्मॉल फायनान्स बँक निर्माण केले. त्यामुळे अशा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध स्मॉल फायनान्स बँका कसलीही कमतरता ठेवत नाहीत.

कोणत्या बँकेत फिक्स्ड डिपॉझिटवर मिळतो सर्वाधिक व्याजदर?

सध्या सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेकडे सीनियर सिटीजनसाठी एक उत्तम योजना आहे. तिथे पाच वर्षांच्या एफडीवर 8.05% इतका व्याजदर मिळतो. सीनियर सिटीजनसाठी असणाऱ्या एफडीवर सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या बँकांच्या यादीत सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक सगळ्यात वरती आहे. त्यानंतर जन स्मॉल फायनान्स बँक दुसऱ्या क्रमांकावर असून सीनियर सिटीजनच्या पाच वर्षांच्या एफडीवर 8.00% व्याजदर देतात. Equitas स्मॉल फायनान्स बँकेचा व्याजदर 7.50% आहे तर AU स्मॉल फायनान्स बँक तसेच Slice स्मॉल फायनान्स बँकेचा व्याजदर 7.25 टक्के आहे. ज्येष्ठ नागरिकांनी एफडीमध्ये गुंतवणूक करून त्यावर चांगला व्याज मिळवण्यासाठी या बँका प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. मुळात, हे व्याजदर 3 कोटींपेक्षा कमी रकमेच्या एफडीसाठी लागू आहेत.

एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा!

एफडीवर मिळणारा व्याजदर जरी जास्त असला तरी ती एफडी सुरक्षित आणि उत्तम ठरत नाही. ज्या बँकेत तुम्ही गुंतवणूक करणार आहात त्या बँकेचा इतिहास तसेच इतर बऱ्याच गोष्टी आधी तपासाव्यात त्यानंतरच गुंतवणूक करण्याचा विचार करावा. फक्त व्याज जास्त मिळतोय त्यामुळे तपासाशिवाय गुंतवणूक करू नये.

मोठ्या बँकांमध्ये किती आहे व्याजदर?

ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या एफडी योजनेत SBI कडून 7.05% दराने व्याज मिळू शकतो. तर HDFC बँकेत ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या चार वर्ष सात महिने एक दिवसांच्या एफडी योजनेत 6.90% दराने व्याज मिळतो. तर आयसीआयसी बँकेत पाच वर्षांसाठी सात पॉईंट दहा टक्के दराने व्याज मिळतो. पीएनबी बँकेत पाच वर्षांच्या एफडी साठी 6.85% व्याजदर आहे

8% FD वर मिळणारी Real Return किती?

जर एखादी एफडी तुम्हाला 8% व्याजदर देत असेल तरीही देशातला महागाई दर तुमच्या एफडीवर मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेला प्रभावित करू शकतो. समजा, महागाई दर 5% असेल तर तुमच्या व्याजदरातून इन्फ्लेशन वजा केला जाईल आणि तुम्हाला 3% दराने व्याज दिला जाईल.

Maharashtra TimesReddit Post: ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार; पानवाल्याची कोट्यवधींची कमाई पाहून बेरोजगार MBA पदवीधरही थक्कजास्त टीडीएस कापून गेला तर…

अनेकदा आपल्या फिक्स्ड डिपॉझिटमधून जास्त टीडीएस कापला जाऊ शकतो पण यात घाबरून जाण्याची काहीच गरज नाही कारण अतिरिक्त कापला गेलेला टीडीएस रिफंड क्लेम करून आयटीआरच्या माध्यमातून मिळवता येतो.

दिवेश चव्हाण

लेखकाबद्दलदिवेश चव्हाणदिवेश दिनेश चव्हाण हे मराठी पत्रकार असून ते सध्या महाराष्ट्र टाइम्स येथे कंटेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. ऑगस्ट 2026 पासून ते महाराष्ट्र टाइम्स येथे अर्थ, पर्सनल फायनान्स आणि देश-विदेशातील बातम्यांसंबंधित लेखन करत आहेत. शेअर बाजारातील घडामोडी, बँकिंग, नवे आर्थिक धोरण आणि तांत्रिक नियम अतिशय सोप्या भाषेत आणि सविस्तर पद्धतीने समजावून सांगणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

यापूर्वी ते नवराष्ट्र या मराठी वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून काम करत होते. या काळात त्यांनी अर्थ, व्यवसाय, करिअर आणि नोकरीसह विविध क्षेत्रातील घडामोडींचे वार्तांकन केले आहे. यासोबतच काल्पनिक कथा लेखन आणि एखाद्या कथेचे स्वारस्यपूर्ण विश्लेषण करण्यातही ते पटाईत आहेत.

त्यांचे शिक्षण ठाणे येथील जोशी बेडेकर महाविद्यालयात झाले. याच ठिकाणी त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्याकडे मास्टर ऑफ आर्ट्स इन मल्टीमीडिया अँड मास कम्युनिकेशन ही पदव्युत्तर पदवी आहे. विविध विषयांवर अचूक आणि विश्वासार्ह बातम्या पुरवणे हा त्यांच्या लेखन, पत्रकारितेच्या माध्यमातून वाचकांना दर्जेदार माहिती देऊन त्यांना जागतिक घडामोडींविषयी जागरुक ठेवणे हा त्यांचा हेतु आहे.
जोशी बेडेकर महाविद्यालयात शिक्षण घेत असताना महाविद्यालयीन वार्षिक अंक Rta मध्ये इंग्रजी रिपोर्टींग विभागाचे हेड म्हणून त्यांनी कारोभार सांभाळला आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत