मध्यपूर्वेतील संघर्षामुळे उद्भवलेल्या तेल आणि गॅस संकटाच्या पार्शवभूमीवर कार आणि मोटरसायकलच्या टाक्यांमध्ये इथेनॉल-मिश्रित पेट्रोल वापरले जात असून आता लवकरच पर्यावरणपूरक इथेनॉल तुमच्या स्वयंपाकघरातही उपलब्ध होऊ शकते. सरकारचा प्लॅन यशस्वी ठरल्यास स्वयंपाकासाठी LPG सिलिंडरवरील अवलंबित्व लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते.
स्वयंपाकाच्या गॅसलाही इथेनॉलचा पर्याय
इथेनॉल-मिश्रित पेट्रोल – E20 – बाबत वाद अजून शांत झालेला नाही. E20 मुळे वाहनांच्या इंजिनचे नुकसान होत आहे आणि इंधन कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याची अनेक लोकांची तक्रार आहे. अशा स्थितीत, E20 पेट्रोलबद्दल वाद संपला नसताना सरकार तुमच्या स्वयंपाकघरातील एलपीजीला पर्याय म्हणून इथेनॉलचा विचार करत आहे.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय इथेनॉलला स्वयंपाकाचे मुख्य इंधन म्हणून वापरण्यासाठी धोरणात्मक आराखड्यावर काम करत असल्याचे सूत्रांनी ईटीला सांगितले. ही योजना यशस्वी झाल्यास सरकारी तिजोरीतील मोठ्या प्रमाणात परकीय चलन वाचू शकते.
Restaurant Service Charge: ग्राहकांकडून सरसकट वसूल करता येणार नाही सेवाशुल्क! 41 रेस्तरॉवर कारवाईचा बडगा, तक्रार कुठे करायची ते समजून घ्या
इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार इथेनॉलच्या वापराला आणखी वाव देण्यासाठी या धोरणात अनुदान आणि पुरवठा साखळी नियमांचा विचार केला जाऊ शकतो. इंधन पुरवठादारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उद्योग संघटनाही या आराखड्यावर सरकारसोबत चर्चा करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
त्याचवेळी, आपल्या घरा-घरांमधील स्वयंपाकघरांमध्ये एलपीजीच्या जागी बायोगॅस आणि इतर हरित इंधनांचा वापर केला गेल्यास 2050 पर्यंत देश 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त बचत होऊ शकते, असे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट (IISD) च्या अहवालातून समोर आले आहे.
सरकारच्या नव्या प्लॅनचा फायदा काय
सरकार सध्या स्वयंपाकासाठी एका पर्यायी स्वच्छ इंधन धोरणावर काम करत आहे, जेणेकरून घरांमध्ये एलपीजीसोबतच स्वयंपाकाचे इंधन म्हणून इथेनॉलचा वापर वाढू शकेल. सप्टेंबर 2026 पर्यंत धोरण तयार केले जाऊ शकते.
तसेच घरांमध्ये स्वयंपाकासाठी अधिक स्वच्छ इंधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सरकारच्या विनंतीनुसार इथेनॉल-बेस्ड स्वयंपाकाच्या चुलींची (स्टोव्ह) चाचणी करत असल्याचेही वृत्त एप्रिलमध्ये समोर आले होते. स्वयंपाकघरात गॅस किंवा इंधन म्हणून इथेनॉलचा वापर केल्यास भारताला LPG वरील अवलंबित्व कमी करण्यास आणि वाढत्या इंधन बिलांमध्ये बचत करण्यास मदत होऊ शकेल.
मध्यपूर्वेतील युद्धामुळे भारताच्या एलपीजी पुरवठ्यावर थेट परिणाम झाला असून सर्वसामान्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. अशा परिस्थितीत, एलपीजीला पर्याय म्हणून अतिरिक्त इथेनॉल क्षमतेचा वापर करणे आणि इंधन आयात कमी करण्याचा आशादायक हा सरकारसमोर एक पर्याय असून गेल्या काही महिन्यांमध्ये भारताने एलपीजीच्या स्रोतांमध्ये विविधता आणली असली तरी, एलपीजी आयातीसाठी अजूनही आखाती देशांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे.

