Erling Haaland News : वडिलांच्या गुडघ्यावर लाथ मारल्याने त्यांना निवृत्त व्हावं लागलं, वर्ल्ड कपचं राहिलेलं अधुर स्वप्न आता आपल्या खांद्यावर घेत एर्लिंग हालँडने आपली छाप पाडली आहे. संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये संघाला क्वालिफाय करण्यापासून ते पाचवेळा वर्ल्डकप विजेत्या ब्राझील संघाला बाहेर करण्यात पठ्ठ्याचा मोलाचा वाटा, या हिरोच्या वडिलांच्या गुडघ्यावर कोणी लाथ मारलेली त्यानंतर त्याचा संपूर्ण प्रवास कसा होता जाणून घ्या.

एर्लिंग हालँडच्या वडिलांसोबत भर मैदानात बदला
१९९७मध्ये लीड्स युनायटेड आणि मँचेस्टर सिटीमधील सामन्यात लीड्सच्या अल्फ-इंगे (एर्लिंग हालँडचे वडील) यांच्या टॅकलमुळे मँचेस्टरचे रॉय मॉरिस कीन जखमी झाले होते. त्यावेळी रॉय कीन जवळपास एक वर्षभर दुखापतीमुळे फुटबॉलपासून लांब राहिले होते. पण त्यांच्या मनात सल राहिलीच होती, त्यानंतर चार वर्षांनी म्हणजे २००१मध्ये पुन्हा दोन्ही संघ आमनेसामने आले. रॉय कीन यांनी अल्फ-इंगेंच्या गुडघ्यावर जोरात लाथ मारली, यामुळे हालँड यांना पुढे फुटबॉल कधीच खेळता आलं नाही शेवटी निवृत्ती घ्यावी लागली. याबाबत आपल्या बायोग्राफीमध्ये रॉय मॉरिस कीन यांनी स्पष्ट केलं की तो जाणूनबुजून मारलं आणि माझा बदला घेतला होता.
Cristiano Ronaldo : वर्ल्डकपमधून पोर्तुगाल बाहेर, रोनाल्डोचं स्वप्न अधुरं, शेवटच्या 1 मिनिटात गेम पालटला
एर्लिंग हालँडचा संपूर्ण प्रवास
एर्लिंग हालँड याचा जन्म २१ जुलै २००१ मध्ये इंग्लंडमधील लीड्स येथे झाला होता. वडील अल्फ-इंगे हालँड व्यावसायिक फुटबॉलपटू आणि आई ग्राय मारिता ब्रॉट हेप्टाथलॉन चॅम्पियन होत्या. दुखापतीमुळे वडिलांना वयाच्या ३०व्या वर्षी निवृत्ती घ्यावी लागली, त्यानंतर अल्फ-इंगे हालँड आपल्या कुटुंबासह नॉर्वेला स्थायिक झाले. एर्लिंग हालँडने वयाच्या पाचव्या वर्षी ‘ब्राइन एफके’ अकादमीमधून आपल्या फुटबॉल प्रवासाला सुरुवात केली आणि नंतर याच क्लबमधून त्याची व्यावसायिक कारकीर्द सुरू झाली.
Neymar Retirement : ब्राझील वर्ल्ड कपमधून बाहेर; नेमारकडून निवृत्तीची घोषणा, मॅच संपल्यावर दोनच ओळी बोलला पण सर्वांच्या काळजाला भिडल्या
फिफा ‘अंडर-२०’ वर्ल्ड कपच्या गट फेरीतील सामन्यात नॉर्वेचा सामना होंडुराशची होता. १८ वर्षांचा एर्लिंग हालँड उंच आणि तगडा ‘स्ट्रायकर’ मैदानावर उतरला. या सामन्यात नॉर्वेने १२-० विजय मिळवला होता. यामधील ९ गोल एकट्या एर्लिंगने केले होते. या ९ गोलमुळेच तो त्या टूर्नामेंटचा गोल्डन बूट विजेता झाला होता. एर्लिंग हालँडने आजवरच्या करिअरमध्ये जुलै २०२६ पर्यंत क्लबसाठी ४०२ मॅचमध्ये ३१७ गोल आणि नॉर्वे संघासाठी ५४ मॅचमध्ये ६२ गोल केले आहेत, म्हणजे एकूण ३७९ गोल. त्याने मोल्डेसाठी १८, साल्झबर्गसाठी २९, डॉर्टमंडसाठी ८६ आणि मँचेस्टर सिटीसाठी १६२ गोल केले, ज्यात प्रीमियर लीगचे ११२ गोल आणि चॅम्पियन्स लीगचे ३६ गोल आहेत. आपल्या करियमध्ये प्रीमियर लीग टायटन्स, चॅम्पियन्स लीग टायटन्स आणि ३ गोल्डन बूट मिळवले. पण एक गोष्ट अजूनही मिसिंग होती. ती म्हणजे नॉर्वे संघ १९९८ नंतर वर्ल्डकपमध्ये एकदाही क्वालिफाय करू शकला नव्हता.
२०२५ वर्ल्डकप क्वालिफाय कॅम्पेन
नॉर्वे संघाने ८ सामन्यात ८ विजय मिळवले, यामध्ये प्रत्येक सामन्यात एर्लिंग हालँडने गोल केलेले. एर्लिंगने एकूण १६ गोल केले होते. १६ नोव्हेंबर २०२५ San Siro Itly विरूद्ध नॉर्वे ४-१ ने जिंकलं. या सामन्यात एर्लिंग दोन मिनिटांत दोन गोल केले. नॉर्वेने तब्बल २८ वर्षांनी वर्ल्ड कपमध्ये क्वालिफाय केले.
FIFA World Cup Trophy : फुटबॉल विश्वचषकाची किंमत 4 वर्षात तब्बल अडीच पटीने वाढली, 6 किलोहून अधिक सोन्याचे मढलेली ट्रॉफी
नॉर्वेचा वर्ल्डकपमधील प्रवास
नॉर्वे संघाचा पहिला सामना इराकसोबत होता. हा सामना ४-१ने नॉर्वेने जिंकत दमदार सुरूवात केली. यामध्ये पहिले दोन गोल एर्लिंग हालँड याने केले. तर दुसरा सामना सेनेगलवविरूद्ध झाला यामध्येही हालँडने दोन गोल करत इतिहासा रचला. पहिल्या वर्ल्ड कपमध्ये दोन सामन्यात दोन-दोन करणारा एर्लिंग हालँड गेल्या ५० वर्षांतील दुसरा खेळाडू ठरला. तिसऱ्या सामन्यामध्ये फ्रान्सने १-४ ने मात करत नॉर्वेला पराभवाचा पहिला झटका दिला. त्यानंतर चौथा सामना ब्राझीलसोबत होता, कोणी विचारही केला नव्हता की पाचवेळा विजेत्या राहिलेल्या ब्राझीलचा पराभव होईल. नॉर्वेकडून हालँडने दोन गोल करत संघाला जिंकवले. जेव्हा जागतिक फुटबॉलमधील अनपेक्षित निकालांची चर्चा होईल यामध्ये आता फिफा वर्ल्ड कप २०२६ मधील ब्राझीलविरुद्ध एर्लिंग हालँड केलेल्या कामगिरीची नक्कीच आठवण काढली जाईल.
दरम्यान, एर्लिंग हालँड नॉर्वेजियन फुटबॉलचा इतिहास नव्याने घडवत आहे. ब्राझीलसारख्या बलाढ्य संघाचा पराभव केल्यानंतर छोट्याशा शहरातून आलेला हा तरुण लाखो फुटबॉल चाहत्यांसाठी प्रेरणास्थान बनला आहे. नॉर्वेचं मिशन वर्ल्डकपमध्ये कुठपर्यंत मजल मारणार की ट्रॉफीवर नाव कोरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

