Headlines

EPFO Settlement Rule Change; 3 दिवसांत क्लेम सेटल होणार, पण ठरलेल्या तारखेला PF जमा न झाल्यास मिळणार 12% व्याज, जाणून घ्या नवीन नियम


EPFO Settlement Deadline Delay: 8 कोटी नोकरदारांच्या कमाईतून EPF खात्यात जमा केले जातात. येथे जमा पैसे तुमच्या भविष्यातील गरजा आणि रिटायरमेंटसाठी असतात, पण खात्यांमधून पैसे काढणे लांबलचक प्रक्रिया पूर्ण करावी लागायची. मात्र, आता EPFO ने ही प्रक्रिया बऱ्याच प्रमाणात सोपी केली असून आता खातेधारकांना केवळ 3 दिवसांत निधी देण्याचे टार्गेट दिले आहे.

EPFO Claim Settlement Rule Change Explained
ठरलेल्या तारखेला PF जमा न झाल्यास मिळणार 12% व्याज(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
PF Withdrawal Rule : अलीकडेच ईपीएफओने पीएफ खात्याशी संबंधित नवीन नियम बदल अधिसूचित केले. यापैकी बरेच नियम ईपीएफओ खातेदारांच्या फायद्याचे असले तरीही एका नियमामुळे PF विड्रॉलची प्रक्रिया पूर्णपणे बदलली जाईल. आता PF खात्यातून तात्काळ पैसे काढण्याची परवानगी देण्यासोबतच यासाठी अधिकारी जबाबदार धरले जातील.

पीएफ खातेधारकाने सेटलमेंटसाठी अर्ज केल्यावर विहित वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी EPFO अधिकाऱ्याची मानली जाते. म्हणजे, खातेदाराला विहित वेळेत निधी मिळाला नाही तर त्या रकमेवर व्याजही मिळेल.

ईपीएफओने PF नियमात बदल केले

एम्प्लॉईज प्रोविडेंट फंड ऑर्गनायझेशन म्हणजे EPFO ने कोट्यवधी सदस्यांच्या PF खात्यातून जमा निधी विड्रॉ करण्याचे नियम पूर्णपणे बदलले आहेत. यासह आता PF Withdrwal अर्ज केल्याच्या 3 दिवसांच्या आत ऑटो-सेटलमेंट अकाउंटमध्ये जमा केले जातील. आवश्यक असल्यास योग्य तपासणीनंतर 20 दिवसांच्या आत PF निधी वितरित केला, पण त्यानंतरही उशीर झाल्यास 12% दराने सदस्यांना व्याज दिले जाईल.

3 दिवसात क्लेम सेटलमेंट अनिवार्य

ईपीएफओच्या नव्या नियमानुसार PF खातेधारकांना केवळ 3 दिवसांत निधी हस्तांतरित करण्याची अधिकाऱ्यांची जबाबदारी असणार आहे. यासाठी ऑटोप्रोसेसिंग सुरू केले गेले असून खातेधारकाचे KYC पूर्ण असेल आणि खाते अपडेटेड असेल तर अर्ज केल्याच्या अवघ्या 3 दिवसांत सेटलमेंटची रक्कम मिळेल. ऑटो-सेटलमेंटअंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंत पीएफ विड्रॉलचा दावा केला जाऊ शकतो तर, आतापर्यंत ऑटो-सेटलमेंट अंतर्गत केवळ 1 लाख रुपयांपर्यंतच विड्रॉल शक्य होते.

सर्व परिस्थितीत 20 दिवसांत सेटलमेंट

त्याचप्रमाणे कोणत्याही पीएफ खातेधारकाच्या अर्जानंतर 20 दिवसांच्या आत सेटलमेंट आणि पैशाचे पेमेंट करणे अनिवार्य असल्याचेही ईपीएफओने स्पष्ट केले. यानुसार एखाद्या कर्मचाऱ्याने फॉर्म 19 आणि 10C अंतर्गत विड्रॉलचा दावा केला असेल तर, ऑटोमॅटिक सेटलमेंट अंतर्गत 3 दिवसांच्या आत आणि छाननीनंतर 20 दिवसांच्या आत पेमेंट केले गेले पाहिजे आणि वैध कारणाशिवाय सेटलमेंटला 20 दिवसांपेक्षा जास्त विलंब करता येणार नाही.

ईपीएफओ कधी देईल 12% व्याज

ईपीएफओने आपल्या नियमांमध्ये अधिकाऱ्यांची जबाबदारीही निश्चित केली आहे. यानुसार संबंधित अधिकाऱ्याने कोणत्याही वैध कारणाशिवाय पीएफ सेटलमेंटला 20 दिवसांपेक्षा जास्त उशीर केला तर, त्यांना पीएफ खातेधारकाला व्याजासहित रक्कम द्यावी लागेल. अशा परिस्थितीत, पीएफ खातेदाराला वार्षिक 12% दराने व्याज दिले जाईल, जे संबंधित अधिकाऱ्याच्या पगारातून कापले जाईल. या नियमामुळे साहजिकच ईपीएफओच्या अधिकाऱ्यांवर सेटलमेंट लवकर पूर्ण करण्याचा दबाव राहील.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा