Headlines

EPFO New Rule For PF Withdrawal ; PF काढण्याच्या प्रक्रियेत मोठे बदल! अटींना पात्र नसाल तर मिळणार नाहीत पैसे, नवे नियम


EPFO PF काढण्याच्या नियमांमध्ये महत्वाचा बदल करण्यात आला आहे. हे बदल आंशिक निकासी, संपूर्ण पीएफ सेटलमेंट तसेच नोकरी सुटणे या संबंधित आहे. विशेष म्हणजे आंशिक निकासीच्या नियमांच्या संख्येत घट करण्यात आली आहे. आधी आंशिक निकासीसाठी 13 नियम लागू होते. आता कर्मचाऱ्यांसाठी ही प्रक्रिया आणखीन सोपी करण्यावर भर देण्यात आला आहे. अडीअडचणीत पैशांची गरज लागली तर कर्मचाऱ्याला पीएफच्या रकमेतील काही अंशा रक्कम आणखीन सोप्या पद्धतीने तसेच जलद मिळवता येणार आहे. आंशिक निकासी तीन श्रेणीमध्ये विभागण्यात आली आहे.

आंशिक निकासीच्या तीन श्रेण्या पुढीलप्रमाणे :

  • मुलांचे शिक्षण, लग्न, आजारपण

जर अडीअडचणीला तुम्हाला पैशांची गरज भासली तर आंशिक निवासी सुविधेअंतर्गत पीएफची काही रक्कम मिळवता येऊ शकते. मुलांच्या शिक्षणासंबंधित आर्थिक अडचण भासल्यास जास्तीत जास्त 10 वेळा पीएफ काढण्याची अनुमती देण्यात आली आहे. घरात लग्न समारंभ असल्यास जास्तीत जास्त 5 वेळा पीएफ काढता येऊ शकतो. तर आजारपणासाठी आंशिक पीएफ निकासी सुविधा कायम ठेवण्यात आली आहे.

  • गृहकर्ज, बांधकाम

नवीन घर खरेदी केले असेल किंवा नवीन घरच्या बांधकामासाठी पैशांची गरज भासत असेल अशावेळी कर्मचाऱ्यांना आंशिक निकासी अंतर्गत पैसे काढता येणार आहे. ही रक्कम एकूण पीएफच्या काही अंशी रक्कम असेल.

  • विशेष परिस्थिती

जर इतर काही कारणांमुळे पैशांची गरज भासत असेल तर अशावेळी कर्मचाऱ्याला पीएफचा आधार घेता येणार आहे. मुख्य म्हणजे EPFO ने पैसे काढण्याचे नियम शिथिल करण्यावर भर दिल्यामुळे कागदपत्रांची गरज कमी भासेल. तसेच बंधने आधीच्या तुलनेने कमी असतील.

नेमका काय आहे 75 : 25 नियम?

समजा एखाद्या कर्मचाऱ्याची नोकरी सुटली आणि कर्मचाऱ्याला पैशांची गरज भासली. अशावेळी कर्मचाऱ्याला पीएफच्या खात्यातील 75% रक्कम ताबडतोब मिळवता येणार आहे. पण जर कर्मचाऱ्याला PF च्या खात्यात असणारी 100% रक्कम हवी असेल तर किमान 1 वर्षांची वाट पहावी लागणार आहे. एकंदरीत, कर्मचाऱ्याची नोकरी सुटली तर ताबडतोब पीएफची 75% रक्कम मिळेल पण शिल्लक 25% रक्कम मिळवण्यासाठी 12 महीने थांबावे लागेल.

PF ची रक्कम मिळवण्यासाठी काही विशेष अटी

आंशिक निकासी असो किंवा संपूर्ण PF Settlement, PF Withdrawal साठी अर्ज करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याने किमान एक वर्ष सेवा देणे बंधनकारक आहे. सेवेची अट पूर्ण नसल्यास कर्मचाऱ्याला कोणत्याही कारणांसाठी पीएफ काढता येणार नाही.

Maharashtra Times8th Pay Commission Delayed: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीच्या आनंदावर विरजण, होणार लाखो रुपयांचे नुकसान; नव्या कॅलक्युलेशनने खळबळPF वर मिळणारा व्याजदर किती?

PF वर मिळणारा वार्षिक व्याजदर 8.25% आहे. जर कर्मचाऱ्याने नोकरी सुटल्यावर पीएफची 75% रक्कम काढून घेतली तर खात्यात असणाऱ्या 25% रकमेवर व्याज मिळत राहते.