Headlines

EPFO New PF Rules ; EPFO चे नवे नियम माहिती आहेत का? आता 20 दिवसांत अर्जाला उत्तर आले नाही तर कर्मचाऱ्याला मिळणार दंड


एम्प्लॉईज प्रॉव्हिडन्ट फंड ऑर्गनायझेशन ( EPFO ) ने काही नियम लागू केले आहेत. या नियमांमुळे आता PF काढणे तर अधिक सोप्पे होणारच आहे, त्याचबरोबर या नियमांमुळे अनेक गोष्टी बदलल्या आहेत. EPFO च्या नियमांनुसार, कर्मचाऱ्यांचे योगदान त्यांच्या बेसिक पगाराच्या 12% ने राहणार. 15,000 रुपये मासिक वेतनाची वैधानिक मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे. सामान्य परिस्थितीत 15,000 रुपयांवर 12% म्हणजे कर्मचाऱ्याचा अनिवार्य PF वाटा जास्तीत जास्त 1,800 रुपये प्रति महिना इतकी असते.

आधी नियमांमध्ये 15,000 रुपये मासिक वेतनाची वैधानिक मर्यादा होती म्हणजे जर मर्यादा बदलायची असेल तर पूर्ण नियमांतच बदल करावा लागत होता. परंतु आता यात बदल करण्यात आला आहे. सरकारकडून मर्यादा बदलण्याचाही सूचना येताच, नियम बदलल्याशिवाय मर्यादा बदलता येण्याची तरतूद विकसित करण्यात आली आहे. एकंदरीत, आता मर्यादा 15,000 रुपये मासिक वेतनाची असल्यास भविष्यात जर 20,000 रुपये मासिक वेतनाची अधिसूचना येताच नियम न बदलता मर्यादेत बादल 5,करणे सोपे होणार आहे.

आधी जर एखाद्याला PF चे पैसे काढायचे असतील तर तेव्हा प्रत्येक कारणासाठी वेगवेगळ्या अटी होत्या. पण आता या अटी कमी करण्यात आल्या असून पैसे काढण्यासाठी तीन श्रेणी देण्यात आल्या आहेत. “गरज, घर आणि विशेष परिस्थिती” या तीन श्रेणींच्या माध्यमातून पैसे काढता येणार आहेत. एखाद्या Emergency वेळी अचानक काढण्यात आलेली PF ची रक्कम गरज या श्रेणीत मोजली जाईल. घराच्या कामासाठी काढण्यात आलेली PF ची रक्कम घर या श्रेणीत मोजली जाईल तर इतर कोणत्या कामांसाठी काढण्यात आलेली PF ची रक्कम विशेष परिस्थिती या श्रेणीत मोजली जाईल.

PF म्हणजे रिटायरमेंटनंतर कर्मचाऱ्याला मिळणारा आधार असतो. त्यामुळे एकाच वेळी PF च्या खात्यात असणारी सगळी रक्कम काढणे अशक्य आहे. किमान 25% रक्कम खात्यात ठेवावी लागते. उदाहरणार्थ, जर कर्मचाऱ्यांच्या PF खात्यात 1,00,000 रुपये आहेत, तर त्यांना त्यातील 25% म्हणजेच किमान 25,000 रुपये रक्कम खात्यात शिल्लक ठेवणे बंधनकारक आहे.

PF काढण्यासाठी सर्व्हिस पिरेड 12 महिन्यांचा देण्यात आला आहे. म्हणजे जर कर्मचाऱ्याला PF त्याच्या खात्यात जमा करून घ्यायचा आहे तर किमान 12 महिन्यांची सेवा पूर्ण असणे बंधनकारक आहे. तसेच अनएम्प्लॉयमेंट पिरेडसाठीही 12 महिन्यांचा कालावधी दिला आहे. एकंदरीत, काम सुटल्यावर PF काढण्यासाठी बेरोजगार व्यक्तीला किमान 12 महिने थांबावे लागणार आहे. तर एखाद्या कर्मचाऱ्याला PF खात्यातून एक ठराविक रक्कम काढायची असल्यास किमान 36 महिन्यांचा वेटिंग पिरेड देण्यात आला आहे.

Maharashtra TimesE20 Petrol Quality: इथेनॉल मिश्रित पेट्रोल एकदम सुरक्षित, वाहनांना धोका नाही! E20 इंधनात भेसळीच्या अफवांवर तेल कंपन्यांचे स्पष्टीकरणविशेष म्हणजे आता कर्मचाऱ्यांना त्यांचा नॉमिनी ऑनलाईन पद्धतीने ठरवता येणार आहे. या प्रक्रियेत कागदपत्रांचा वापर फारसा कमी करण्यात आला आहे. EPFO ने Claim Settlement साठी 20 दिवसांची मुदत दिली आहे. एकंदरीत, जर कर्मचाऱ्याने PF च्या खात्यातून एक ठराविक मुदत काढण्यासाठी अर्ज केला आणि त्या अर्जाला पुढील 20 दिवसांत EPFO कडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. तर EPFO स्वतः दंड म्हणून काही रक्कम कर्मचाऱ्याला देते.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत