EPFO Interest Credit 2026 Update: आर्थिक वर्ष 2025-26 साठी EPFO कडून 15 जुलैपर्यंत 8.25% व्याज 3.4 कोटी खात्यांमध्ये क्रेडिट करण्याची सुरुवात होणार आहे. अर्थ मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर EPFO खात्यावर व्याज नवीन केंद्रीकृत IT प्रणालीद्वारे हस्तांतरित केले जाईल आणि सदस्य पासबुकमध्ये तपासू शकतील.

सहसा पीएफ खात्यातील शिल्लकवर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये व्याज क्रेडिट दिले जाते, पण यावेळी नवीन केंद्रीकृत आयटी प्रणालीमुळे अधिक वेगाने व्याज क्रेडिट केले जाणार असून यावेळी, एकूण 1.44 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त व्याजाचे वितरण केले जात आहे. तुमचेही पीएफ खाते असेल आणि तुमच्या पीएफ बॅलन्सनुसार खात्यात किती व्याज मिळेल खालील कॅल्क्युलेशनद्वारे समजून घेऊ. 10 लाख, 50 लाख आणि एक कोटींच्या शिल्लक रकमेवर किती व्याज मिळेल पाहूया.
Gold Silver Rate Today: सराफा बाजार पुन्हा धडाम! ग्राहकांच्या चेहऱ्यावर उमटलं समाधान; सोने-चांदीच्या किमती पुन्हा लालेलाल
8.25% व्याजदर ऐकायला चांगला वाटतो पण, तुमच्या खात्यात प्रत्यक्षात किती रक्कम जमा होईल? खालील चार्टद्वारे समजून घ्या
| 5 लाख रुपये | 41,250 रुपये | 5,41,250 रुपये |
| 10 लाख रुपये | 82,500 रुपये | 10,82,500 रुपये |
| 50 लाख रुपये | 4,12,500 रुपये | 54,12,500 रुपये |
| 1 कोटी रुपये | 8,25,000 रुपये | 1,08,25,000 रुपये |
नोट करा: वरील कॅल्क्युलेशन आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये तुमचे पीएफ शिल्लक ‘जैसे थे’ राहिले या गृहितकावर आधारित आहे. पीएफ व्याजाची गणना तुमच्या मासिक चालू शिलकीच्या आधारावर केली जाते, जी तुमच्या मासिक योगदान किंवा काढलेल्या रकमेनुसार बदलू शकते.
Robert Kiyosaki: तुमचे पैसे बुडणार? ‘इतिहासातील सर्वात मोठं मार्केट क्रॅश होणार’; म्युच्युअल फंड, ETF गुंतवणूकदारांना कियोसाकीचा इशारा
अशाप्रकारे, वरील कॅल्क्युलेशनद्वारे पीएफ खात्यातील शिल्लक रकमेवर भरपूर फायदा मिळेल हे स्पष्ट दिसून येते. उदाहरणार्थ, एखाद्याच्या खात्यात 50 लाखांचा निधी असेल, तर कोणत्याही बाजारातील जोखमीशिवाय आणि एकही रुपया न काढता थेट 4 लाखांपेक्षा जास्त रकमेचा फायदा मिळतो. तसेच एक कोटींच्या पीएफ शिल्लक रकमेवर फक्त व्याजातून 8.25 लाख रुपये मिळतील आणि ही रक्कम अनेकांच्या सुरुवातीच्या वार्षिक पगारापेक्षा जास्त आहे.
तुमचा पीएफ बॅलन्स कसा तपासायचा?
अशाप्रकारे तुमच्या अकाउंटमध्ये पीएफ व्याज क्रेडिट झाला आहे की नाही? तपासण्यासाठी तुमचा UAN सक्रिय केलेला असणे आवश्यक आहे. त्यानंतर, खालील स्टेप्स फॉलो करा:
स्टेप 1: सर्वप्रथम EPFO च्या ‘मेंबर पासबुक’ पोर्टलवर जा
स्टेप 2: तुमचा UAN, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉग इन करा.
स्टेप 3: तुमच्या आधारही लिंक्ड मोबाईल नंबरवर OTP येईल, जो तुमची ओळख पडताळण्यासाठी प्रविष्ट करा.
स्टेप 4: त्यानंतरView Passbook पर्याय निवडा. येथे, तुम्हाला तुमची नवीन पीएफ शिल्लक आणि आर्थिक वर्ष 2025-26 साठी जमा झालेले व्याज दिसेल.

