Headlines

Emraan Hashmi Diagnosed With Swine Flu Tests Positive For H1n1 ; इम्रान हाश्मीला H1N1 ची लागण, डॉक्टरांचा आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला; बंगळुरूमधला कार्यक्रमही रद्द


Emraan Hashmi Health Update :अभिनेता इम्रान हाश्मी आजारी पडला आहे. आवारापन 2 च्या यशादरम्यान त्याला या आजारीची लागण झाल्याने डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिला आहे.

इम्रान हाश्मी
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अभिनेता इम्रान हाश्मी सध्या त्याच्या सिनेमामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचा आवारापन 2 हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मात्र ‘आवारापन 2’ च्या यशाचा आनंद घेत असलेल्या इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. अलीकडेच त्याने H1N1 ची टेस्ट केली होती, ज्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे बोलले जात आहे. डॉक्टरांनी त्याला आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला दिला आहे. इम्रान हाश्मी कामाच्या निमित्ताने रांचीला गेला होता आणि परतल्यानंतर त्याने ही टेस्ट करून घेतली; गेल्या काही दिवसांपासून त्याला सतत अस्वस्थ वाटत होते.

इम्रान हाश्मीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून आपण आजारी असल्याचे आणि त्यामुळे बेंगळुरू येथील आपला कार्यक्रम रद्द केल्याची माहिती दिली; मात्र या पोस्टमध्ये त्याने त्याला स्वाइन फ्लू झाल्याचा उल्लेख त्याने केला नव्हता. आता डॉक्टरांनी त्याला खबरदारी घेण्याचा, विलगीकरणात राहण्याचा आणि आरोग्याची योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

Maharashtra TimesGoshta Ajun Sampleli Nahi : मराठी रंगभूमीवर पहिल्यांदाच अंगावर काटा आणणारा प्रयोग, 360 डिग्रीत सादरीकरण! दाटलेल्या अंधारात संशयाची सावली- गोष्ट अजून संपलेली नाही

इम्रान हाश्मीची प्रकृती बिघडली; बेंगळुरूतील कार्यक्रम रद्द

आपल्या पोस्टमध्ये इम्रान हाश्मी याने लिहिले आहे की, “नमस्कार बेंगळुरू, माझी प्रकृती खूप खराब आहे आणि दुर्दैवाने, मी बेंगळुरूतील कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाही. पण हा कार्यक्रम रद्द झालेला नाही, तर तो केवळ पुढे ढकलण्यात आला आहे. मी तुम्हाला शनिवारी, 12 सप्टेंबर रोजी ‘सनबर्न युनियन’ येथे भेटेन. तुमची तिकिटे नवीन तारखेसाठी वैध राहतील. मी तुम्हाला भेटण्यासाठी खूप उत्सुक आहे.”

Maharashtra TimesSunil Pal On Samay Raina : घोर कलियुग!आधी अपशब्द वापरा मग सन्मानही मिळवा; महाराष्ट्र सरकराकडून समय रैनाचा सत्कार होताच सुनील पालचा संताप

रांचीमध्ये असताना इम्रान हाश्मीची वैद्यकीय चाचणी पॉझिटिव्ह

‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, इम्रान हाश्मी आपल्या व्यावसायिक कामांसाठी प्रवास करत होता आणि अलीकडेच तो रांचीमध्ये होता. तो त्याच्या ‘G9’ या नवीन चित्रपटाचे शूटिंगही तिथे करत आहे, या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. रांचीहून परतल्यानंतर काही दिवस त्याला अस्वस्थ वाटत होते, त्यामुळे त्याने वैद्यकीय चाचणी करून घेतली; या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि त्याला स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे त्यात समोर आले.

इम्रान हाश्मीच्या ‘आवारापन 2’ ची जोरदार कमाई; सर्वत्र चर्चा

इमरान हाश्मीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, तो सध्या ‘आवारापन 2’ मुळे चर्चेत आहे. हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून तो विक्रमी कमाई करत आहे. ‘सॅकनिल्क’ च्या आकडेवारीनुसार, ‘आवारापन 2’ ने 15 दिवसांत देशभरात 173.30 कोटी रुपयांचे ‘ग्रॉस कलेक्शन’ आणि 145.45 कोटी रुपयांचे ‘नेट कलेक्शन’ केले आहे. त्याचबरोबर, या चित्रपटाने जगभरात 205.35 कोटी रुपयांचे ‘ग्रॉस कलेक्शन’ नोंदवले आहे. इम्रान हाश्मी सोबत या सिनेमात दिशा पाटणी मुख्य भूमिकेत आहे.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.
आणखी वाचा