या आर्थिक नुकसानाचे नेमकं कारण काय?
एलोन मस्क यांच्याकडे Spacex या कंपनीचे सगळ्यात जास्त शेअर्स आहेत. जर एखाद्या कंपनीचा सगळ्यात मोठा भाग त्यांच्याकडे असेल तर नक्कीच त्या कंपनीचा मोठा परिणामही त्यांच्यावर जाणवेल. जून 2026 मध्ये Spacex कंपनीचा IPO लिस्ट करण्यात आला. त्यावेळी या IPO ची प्राईज 135 डॉलर ठेवण्यात आली. Spacex ने संपूर्ण कार्यकाळात आजपर्यंत 200 डॉलर्सचा आकडा गाठला आहे.
मध्यंतरी कंपनीने जाहीर केलेल्या दुसऱ्या तिमाही निकालात वाढलेल्या खर्चाचा परिणाम घसरणीवर झाला असल्याची चर्चा सुरु आहे. दुसऱ्या तिमाही निकालात कंपनीचा कॅपेक्स 18.4 अब्ज डॉलर्सवर पोहचला, तो आधीच्या तुलनेत फार जास्त होता. कंपनीने अपेक्षेपेक्षा मोठा खर्च AI वर केल्याने गुंतवणूकदार चिंतेत पडले. याचा मोठा परिणाम कंपनीच्या शेअर्सवर दिसून येत आहे. बुधवारी SPACEX च्या शेअर्समध्ये एकूण 13.6% ची घसरण नोंदवली गेली आहे.
गडगंज श्रीमंत एलोन मस्क यांना लाखो कोटींचे नुकसान?
जरी एलोन मस्क यांना SPACEX या शेअर्समध्ये मोठा आर्थिक नुकसान झाला असला तरी त्यांच्याकडे अजूनही ते शेअर्स आहेत, त्यामुळे भविष्यात जर SPACEX शेअर्सचे बाजारमूल्य वाढले तर नक्कीच एलोन मस्क यांच्या तोट्याचे रूपांतर नफ्यात होऊ शकतात. त्यांना प्रत्यक्ष आर्थिक नुकसान झालेला नाही. काही सूत्रांनुसार, एलोन मस्क यांची टोटल नेटवर्थ सुमारे 687 अरब डॉलर्स आहे.
LPG Price Hike : सरकारचा एक होकार अन् सामान्यांच्या खिशावरील भार वाढणार; LPG सिलेंडरच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यताघसरणीला कारणीभूत ठरलेला ‘कॅपेक्स’ नेमकं काय असतं?
कॅपेक्स म्हणजे कंपनीने केलेला खर्च. जेव्हा एखादी कंपनी उत्पन्न किंवा क्षमता वाढवण्यासाठी पैसे खर्च करते किंवा गुंतवते, त्या खर्चाला किंवा गुंतवणुकीला कॅपेक्स म्हणतात. साधारपणे, नवे कारखाने उभारणे, यंत्रसामग्री खरेदी करणे तसेच डेटा सेंटर उभारणे अशा गोष्टींवर केल्या जाणाऱ्या खर्चांना कॅपेक्स म्हणतात. येथे एलोन मस्क यांच्या Spacex या कंपनीने AI वर अपेक्षेपेक्षा खर्च केला आहे. म्हणजेच कंपनीचा दुसऱ्या तिमाही निकालातील कॅपेक्स हा 18.4 अब्ज डॉलर्स असून त्यातील मोठा वाटा हा AI क्षेत्रासंबंधित आहे, जे शेअर्सच्या गुंतवणूकदारांना पटलेले नाही.

