Headlines

elderly patient on oxygen dies after power cut by mahavitaran in nandurbar mhasavad ; महावितरणने घेतला वृद्धाचा बळी; वीजपुरवठा खंडित केल्याने ऑक्सिजनवरील रुग्णाचा मृत्यू


Nandurbar News: महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधूनही वीजपुरवठा सुरळीत न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

nandurbar news
nandurbar news(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, धुळे: म्हसावद (ता. शहादा, जि. नंदुरबार) परिसरात महावितरणच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वीजपुरवठा खंडित केल्याने ऑक्सिजनवर उपचार घेत असलेल्या वृद्ध रुग्णाला आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन मिळू शकला नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच बिघडली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. तसेच अनेक रुग्णांना अक्षरशः रस्त्यावर उपचार द्यावे लागल्याची संतापजनक परिस्थिती निर्माण झाली होती.

वीज वितरण कंपनीने बुधवारी सकाळी संबंधित खासगी रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित केला होता. त्याचवेळी रुग्णालयात इस्लामुद्दीन नझरुद्दीन लोहार (रा. म्हसावद, ता. शहादा) यांच्यावर उपचार सुरू होते. रात्रभर सुरळीत ऑक्सिजनपुरवठा त्यांना मिळाला नसल्याने गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे मयताच्या नातेवाइकांनी संताप व्यक्त केला. वीज नसल्यामुळे रुग्णालय प्रशासनाला रुग्णांना उघड्यावर उपचार देण्याची वेळ आली. काही रुग्णांना तातडीने शहादा येथे हलवण्यात आले, तर काही रुग्णांवर सध्या दुसऱ्यांकडून वीजपुरवठा घेऊन उपचार सुरू आहेत.

Maharashtra TimesDhule Accident : प्रियंकाचं काय चुकलं? विज्ञान शाखेच्या हुशार विद्यार्थिनीच्या दुर्देवी मृत्यूने धुळ्यात हळहळ, कॉलेजवरून जाताना नेमकं काय घडलं?
दरम्यान, म्हसावद ग्रामीण रुग्णालयाची इमारत सध्या बांधकामात असल्याने, हे रुग्णालय राणीपूर येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. परिणामी म्हसावदच्या ५० किलोमीटरच्या परिसरात एकही शासकीय रुग्णालय उपलब्ध नसल्याने नागरिकांना खासगी रुग्णालयांवरच अवलंबून राहावे लागत आहे. अशा परिस्थितीत महावितरणकडून खासगी रुग्णालयावर करण्यात आलेली कारवाई ही अत्यंत बेजबाबदार असून, रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण करणारी असल्याचा आरोप होत आहे. ग्रामीण भागात वारंवार वीज खंडित होत असल्यामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

Maharashtra TimesSangli Crime: नर्सरीतील शेडला भीषण आग; दाराला कडी लाऊन पती पळाला, विवाहितेचा होरपळून मृत्यू, सांगली हादरलं
वीज बिल भरूनही आमच्या रुग्णालयाचा वीजपुरवठा कापण्यात आला. यामुळे ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांना मोठा धोका निर्माण झाला. वीज नसल्यामुळे आम्हाला रुग्णांना रस्त्यावर उपचार द्यावे लागले. हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. –डॉ. श्रीरात पवार

संबंधित डॉक्टरांनी घरगुती मीटरवरून दवाखाना व मेडिकल या ठिकाणी वीजपुरवठा सुरू केल्याचे दिसून आल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. घरगुती वीज मीटरवरून व्यवसायासाठी वीज वापरणे अवैध असल्याने वीजपुरवठा खंडित केला होता. – युगल प्रसाद, कार्यकारी अभियंता, म्हसावद, शहादा

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा