Eknath Shinde meets Amit Shah in Delhi Shiv Sena to get two portfolio in Cabinet reshuffle; एकनाथ शिंदे रात्री दिल्लीत, अमित शाहांसोबत बैठक, दोन मंत्रिपदांची चिन्हं, महाराष्ट्राबाबत महत्त्वाची चर्चा
Eknath Shinde meets Amit Shah in Delhi Shiv Sena to get two portfolio in Cabinet reshuffle; एकनाथ शिंदे रात्री दिल्लीत, अमित शाहांसोबत बैठक, दोन मंत्रिपदांची चिन्हं, महाराष्ट्राबाबत महत्त्वाची चर्चा
Eknath Shinde meets Amit Shah : शिवसेनेला केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात एक कॅबिनेट मंत्रिपद आणि एक राज्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात असून कॅबिनेटमध्ये खासदार श्रीकांत शिंदे, तर राज्यमंत्रिपदी ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधव यांची नावे चर्चेत आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळातील बहुचर्चित फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी रात्री उशिरा नवी दिल्लीत दाखल झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांनी भेट घेऊन चर्चा केली. या वेळी ‘शिवसेना उबाठा’मधून फुटून शिवसेनेत आलेले सहा खासदारही शिंदे यांच्यासोबत होते. शिवसेनेला या विस्तारात एक कॅबिनेट मंत्रिपद आणि एक राज्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात असून कॅबिनेटमध्ये खासदार श्रीकांत शिंदे, तर राज्यमंत्रिपदी ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधव यांची नावे चर्चेत आहेत.
फुटीरांना मंत्रिपद मिळण्याची चर्चा
लोकसभेत संख्याबळ वाढलेल्या शिवसेनेला या विस्तारात एक कॅबिनेट मंत्रिपद आणि एक राज्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संसदेचे अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार असून, त्यापूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल होऊ शकतो. शिवसेना उबाठा, आम आदमी पक्ष व तृणमूल काँग्रेसमध्ये अलीकडेच झालेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित मंत्रिमंडळ विस्तारात या तिन्ही पक्षांच्या फुटीर गटांतील नेत्यांना केंद्रात मंत्रिपदे मिळण्याची चर्चा आहे.
दिल्लीस रवाना होण्यापूर्वी शिंदे यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्र्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि राज्यातील रखडलेल्या महामंडळ विस्तारावर चर्चा झाल्याचे समजते. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील सहा बंडखोर खासदार शिवसेनेत सहभागी झाल्याने शिवसेना खासदारांची संख्या १३ वर गेली आहे. यामुळे तो महाराष्ट्रात सर्वाधिक खासदार असणारा पक्ष ठरला आहे.
Harshwardhan Sapkal | राम मंदिर घोटाळ्यावरून हर्षवर्धन सपकाळ कडाडले; आरएसएसला आव्हान
धर्मेंद्र प्रधान-अश्विनी वैष्णव यांचे खातेबदल?
प्रस्तावित फेरबदलांमध्ये सध्याच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल होण्याबरोबरच काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते. विविध राज्यांना आणि सामाजिक घटकांना प्रतिनिधित्व देण्यावरही भर राहण्याची शक्यता आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि इतर काही वरिष्ठ मंत्र्यांचे खाते बदलू शकते किंवा त्यांना नवीन जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात, असे भाजपमधील सूत्रांचे म्हणणे आहे. Jayant Patil : भाजपश्रेष्ठींचा विरोध मावळावा, जयंत पाटलांचे फडणवीसांना साकडे? ‘वर्षा’वर तासभराच्या बैठकीने चर्चांना उधाण
नव्या चेहऱ्यांना संधी शक्य
दरम्यान, उत्तर प्रदेशासह आगामी विधानसभा निवडणुका, विविध राज्यांतील सामाजिक-जातीय समीकरणे आणि राजकीय संतुलन लक्षात घेऊन मंत्रिमंडळात काही मंत्र्यांचा खातेबदल व काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे; तसेच शिवसेनेसह ‘एनडीए’तील मित्रपक्षांनाही योग्य प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. बिहारचे मुख्यमंत्रिपद सोडून दिल्लीत परतलेले ‘जेडीयू’चे नेते नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाची जोरदार चर्चा आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा