Headlines

Drinking water before brushing benefits and morning saliva health facts explained; ब्रश करण्यापूर्वी पाणी पिण्याचे फायदे आणि सकाळच्या लाळेचे आरोग्य रहस्य


सकाळी उठल्यानंतर ब्रश करण्यापूर्वी पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नुकसानकारक, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. काही लोकांना वाटते की तोंडातील बॅक्टेरिया पोटात गेल्याने आजार होऊ शकतात, परंतु वैज्ञानिक संशोधन वेगळीच माहिती देते. सकाळच्या लाळेमध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल गुणधर्म, पाचक एन्झाईम्स आणि शरीरासाठी उपयुक्त घटक असतात. हे घटक पचनक्रिया सुधारण्यास आणि शरीरातील जंतूंशी लढण्यास मदत करतात. जाणून घ्या सकाळी ब्रश न करता पाणी पिण्यामागील वैज्ञानिक कारणे, त्याचे फायदे आणि कोणत्या परिस्थितीत काळजी घेणे आवश्यक आहे.

drinking water before brushing teeth in morning benefits side effects morning saliva is good or bad for health know facts
drinking water before brushing teeth in morning benefits side effects morning saliva is good or bad for health know facts
अनेक लोकांना असे वाटते की ब्रश न करता पाणी प्यायल्याने तोंडात असलेले बॅक्टेरिया पोटात जातील आणि आपण आजारी पडू. परंतु, वास्तवात असे होत नाही. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनवर प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार, रात्री आपल्या तोंडात जे बॅक्टेरिया जमा होतात, ते बहुतांश अंशी ‘गुड बॅक्टेरिया’ (चांगले जिवाणू) असतात. जेव्हा तुम्ही पाणी पिता, तेव्हा ही लाळ आणि बॅक्टेरिया पोटात जातात. पोटातील अत्यंत तीव्र असणारे हायड्रोक्लोरिक ॲसिड या बॅक्टेरियांचा नाश करते आणि शरीराला त्यांचे दुष्परिणाम होऊ देत नाही.

सकाळची तोंडातील लाळ आरोग्यासाठी का चांगली असते?

सकाळची तोंडातील लाळ आरोग्यासाठी का चांगली असते?

रात्री झोपताना आपल्या तोंडात लाळेची निर्मिती मंदावते, ज्यामुळे लाळ जास्त वेळ तोंडात साचून राहते आणि ती अधिक संपुष्ट (Concentrated) बनते. या सकाळच्या पहिल्या लाळेला आयुर्वेदात ‘अमृततुल्य’ मानले गेले आहे आणि आधुनिक विज्ञानानेही याचे महत्त्व मान्य केले आहे. युटी हेल्थच्या संशोधनानुसार,

  • पाचक रसांचे कार्य : जेव्हा ही लाळ पोटात जाते, तेव्हा ती पोटातील ॲसिडची पातळी संतुलित राखण्यास मदत करते.
  • नैसर्गिक अँटीबायोटिक : लाळेमध्ये जखम बरी करण्याचे आणि जंतूंचा नाश करण्याचे नैसर्गिक गुणधर्म असतात.

सकाळच्या पहिल्या लाळेत कोणते पोषक घटक असतात?

 सकाळच्या पहिल्या लाळेत कोणते पोषक घटक असतात?

लाळ म्हणजे केवळ पाणी नसून, ते अनेक औषधी आणि जैविक घटकांचे मिश्रण आहे. सकाळच्या पहिल्या लाळेत प्रामुख्याने खालील घटक आढळतात. इंटरनॅशनल जर्नल ऑफ अॅडव्हान्स्ड रिसर्च इन बायोलॉजिकल सायन्सेसच्या रिपोर्टनुसार,

  • लायसोझाईम (Lysozyme) : हे एक शक्तिशाली अँटी-बॅक्टेरिअल एन्झाईम आहे, जे हानिकारक जिवाणूंच्या पेशींची भिंत तोडून त्यांचा नाश करते.
  • अमायलेज (Amylase) आणि टायलीन (Ptyalin) : हे एन्झाईम्स पचनक्रिया मजबूत करतात आणि कर्बोदकांचे (Carbohydrates) पचन तोंडातूनच सुरू करतात.
  • इम्युनोग्लोब्युलिन ए (IgA) : हा एक प्रकारचा अँटीबॉडी (प्रतिकारशक्ती घटक) आहे, जो शरीराला विविध संसर्गापासून वाचवतो.
  • खनिजे (Minerals) : यात सोडिअम, पोटॅशिअम, कॅल्शिअम आणि फॉस्फेट असतात, जे दात मजबूत ठेवण्यास (Remineralization) मदत करतात.​

सकाळी उठल्यावर ब्रश न करता पाणी पिण्याचे ५ वैज्ञानिक फायदे

सकाळी उठल्यावर ब्रश न करता पाणी पिण्याचे ५ वैज्ञानिक फायदे

जर तुम्ही सकाळी न चुकता ब्रश करण्यापूर्वी किमान १ ते २ ग्लास कोमट किंवा साधे पाणी प्यायलात, तर शरीरात खालील सकारात्मक बदल घडतात.

  • मेटाबॉलिझम वाढते (Metabolism Boost) : ‘जॉन्स हॉपकिन्स मेडिसिन’ च्या विविध संशोधनांनुसार, सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिल्याने शरीराचा चयापचय दर (Metabolism) सुमारे २४% ते ३०% ने वाढतो. यामुळे अन्न पचण्याची गती सुधारते आणि वजन नियंत्रणात राहते.
  • बद्धकोष्ठतेपासून मुक्ती (Relief from Constipation) : सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिल्याने आतड्यांमध्ये एक प्रकारची हालचाल (Peristalsis movement) निर्माण होते. लाळ पोटातील आम्लता कमी करते आणि पाणी मळ मऊ करण्यास मदत करते, ज्यामुळे पोट अगदी सहज आणि साफ होते.
  • नॅचरल डिटॉक्सिफिकेशन (Body Detox) : रात्रभरात शरीर अंतर्गत स्तरावर अनेक विषारी घटक (Toxins) गोळा करते. सकाळी पाणी पिल्याने हे टॉक्सिन्स लघवीवाटे शरीरातून सहज बाहेर पडतात, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते.
  • त्वचेवर नैसर्गिक चमक (Skin Glow) : जेव्हा शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि शरीर पूर्णपणे हायड्रेट होते, तेव्हा त्याचा थेट परिणाम त्वचेवर दिसतो. यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतात आणि त्वचा चमकदार दिसते.
  • ॲसिडिटी आणि जळजळ कमी होते : ज्यांना सतत हायपर-ॲसिडिटीचा त्रास असतो, त्यांच्यासाठी सकाळची लाळ वरदान आहे. ती पोटात गेल्याने रात्री साचलेले ॲसिड शांत होते आणि छातीतील जळजळ थांबते.

हे कसे करावे? (योग्य पद्धत)

हे कसे करावे? (योग्य पद्धत)

सकाळी उठल्या उठल्या अंथरुणावर असतानाच मलासन स्थितीत बसून (Malasana) हळूहळू घोट घोट (Sip by Sip) पाणी प्यावे. पाणी एकदम घटाघटा पिण्याऐवजी तोंडात थोडे फिरवून प्यावे, जेणेकरून जास्तीत जास्त लाळ पाण्यासोबत पोटात जाईल. पाणी पिल्यानंतर १५ ते २० मिनिटांनी तुम्ही नियमित ब्रश करू शकता.

कोमट पाणीच घ्या

कोमट पाणीच घ्या

याशिवाय, सकाळी रिकाम्या पोटी पाणी घेतल्यानंतर शरीरातील लिम्फॅटिक सिस्टीम (Lymphatic System) अधिक सक्रिय होण्यास मदत मिळू शकते. ही प्रणाली शरीरातील अनावश्यक द्रव्ये आणि सूक्ष्म अशुद्ध घटक बाहेर काढण्याचे कार्य करते. रात्री दीर्घ काळ विश्रांतीनंतर शरीरातील पेशींमध्ये जमा झालेली अतिरिक्त द्रव्ये सकाळच्या द्रव सेवनामुळे प्रवाही होऊ लागतात. त्यामुळे काही लोकांना सकाळी पाणी घेतल्यानंतर शरीर हलके वाटणे, चेहऱ्यावरील सूज कमी होणे किंवा दिवसभर ऊर्जा टिकून राहणे असे अनुभव जाणवू शकतात. विशेषतः कोमट द्रव घेतल्यास आतड्यांच्या नैसर्गिक हालचाली अधिक सुरळीत होण्यास मदत मिळते. तसेच, दिवसाची सुरुवात पुरेशा द्रव सेवनाने केल्याने मेंदूच्या कार्यक्षमतेवरही सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो, कारण शरीरातील सौम्य द्रवकमतरता देखील एकाग्रता आणि सतर्कतेवर प्रभाव टाकते.

आम्ही या लेखाचे पुनरावलोकन कसे केले

आमची टीम आरोग्य आणि वेलनेसविषयी सतत नवे व उपयुक्त लेख तयार करते. प्रत्येक लेख वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने लिहिला जातो, त्यामुळे दिलेली माहिती विश्वासार्ह आणि अचूक असते.

  • नवीन आवृत्ती
  • Jul 10, 2026, 11:57 AMMedically Reviewed byDr. Dr Honey Savla
  • Jul 10, 2026, 11:57 AMWritten byप्रतीक्षा सुनील मोरेमहाराष्ट्रटाइम्स.कॉम