Donald Trump यांनी लेक ऑन्टारिओचं नाव बदलून लेक अमेरिका केलं, कॅनडातून तीव्र विरोध – donald trump changes lake ontario’s name to lake america amid tensions with canada
Donald Trump यांनी लेक ऑन्टारिओचं नाव बदलून लेक अमेरिका केलं, कॅनडातून तीव्र विरोध – donald trump changes lake ontario’s name to lake america amid tensions with canada
अमेरिका आणि कॅनडादरम्यान एक मोठं ट्रेड वॉर सुरू आहे. त्यातच या जगातील दोन सर्वात जवळचे शेजारी आणि व्यावसायिक भागीदार असलेल्या अमेरिका आणि कॅनडा यांच्यात सध्या एक मोठा राजकीय आणि राजनैतिक वाद पेटला आहे. हा वाद कोणत्याही लष्करी संघर्षाचा नाहीये तर हा वाद चक्क एका सरोवराच्या नावावरून सुरू झालाय. उत्तर अमेरिकेतील पाच ग्रेट लेक्सपैकी एक असलेले ‘लेक ऑन्टारियो’ अचानक जागतिक बातम्यांच्या केंद्रस्थानी आलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका विशेष कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करून या सरोवराचे नाव बदलून ‘लेक अमेरिका’ ठेवण्याची घोषणा केली आहे. पण एका ऐतिहासिक सरोवराचे नाव एका रात्रीत कसे बदलू शकते? कॅनडा याला इतका तीव्र विरोध का करतंय? आणि या नावाच्या वादामागे नक्की कोणते व्यापारी युद्ध दडले आहे? तेच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजून घेऊया…