मग इथं या विश्वात काय नसतं? भगवंतानं दिलेलं खूप काही तर असतं. सरलं काय – उरलं काय याचं मोजमाप करायचं तरी कसं ? पापण्यांत पाणी असावं. उरात सल ठेवावी. कानांत चाहूलीचा भास असावा. हुंदक्यांना अखेर नाही.
सगुण-निर्गुण कळिकाळाच्या माथा…(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
डॉ . सुनील शिंदे
जगरहाटीच मोठी विलक्षण. स्वार्थ गोड लागतो. प्रपंची अनावश्यक गुंतून पडण्यात अपार आनंद वाटतो. परमार्थ मात्र कडू वाटतो! कमळात अडकणाऱ्या भ्रमराचं रूपक संतांनी सुरेख प्रतिपादन केलं. प्रसंगी माणसं नाती विसरतात. नाती तुटू नयेत. माणसं तोडू नयेत. तोडायला वेळ नाही लागत. जोडणं जपणं दिव्य असतं. पुण्याचंही असतं. ‘पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी’ असं नाथांनी सांगितले. जग कळायला हवं.
मग इथं या विश्वात काय नसतं? भगवंतानं दिलेलं खूप काही तर असतं. सरलं काय – उरलं काय याचं मोजमाप करायचं तरी कसं ? पापण्यांत पाणी असावं. उरात सल ठेवावी. कानांत चाहूलीचा भास असावा. हुंदक्यांना अखेर नाही. आठवणींना अंत नसतो. भावनेला विसावा नसतो. कुणासाठी कान्होबाची गीता असते. ज्ञानोबाची साथ असते. तुकोबांची गाथा असते. कधी प्रवरेतली, तर कधी गोदावरी – गंगेची ओंजळ असते. अगस्तींची वाणी असते. दत्तप्रभूंचा हात असतो.
धकाधकीच्या जीवनात, प्रचंड ताणतणाव असणाऱ्या युगात नामस्मरण खरंतर औषधासारखं. लाख मोलाचं अन् उपकारक. काळालाही पराभूत करणारं. मनोबल वाढवणारं.
संत सावता महाराजांचा दाखला आहे –
नामाचिया बळें न भिऊं सर्वथा ।
कळिकाळाच्या माथा सोटे मारूं॥
नामसाधनेमुळे कित्येक तरल्याचे दाखले संत साहित्यात मिळतात. जेथे नामघोष तेथे लक्ष्मीसह लक्ष्मीविलास असं म्हटलं गेलं. साक्षात भगवंतासही तिष्ठावं लागतं ते नाम सामर्थ्य आहे. भाव सद्गदित हवा. कंठ सद्गदित असावा. देहदेखील पावन व्हावा अन् वाणी पुण्यवंत ठरावी ते भाग्य नामामुळे आहे. नाम घेणारा आयुष्यात वाया गेला असा दाखवा… हे आव्हान आहे संत सज्जनांचं! खरं तर अक्षर तेच ज्याला क्षरत्व नाही. नाश नाही. ऱ्हास नाही. तेच खरंखुरं अक्षरत्व. भावभक्तीचं, अक्षर ब्रह्माचं – नामाचं मोल नाही होत कधी.
उणिवांचा गलबला तर अस्वस्थ करतो जीवांना. काळीज हलवतो. डोहकाळिमा डहुळून टाकतो. अशा वेळी माणसाला नाम अपार दिलासा देतं.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा