Headlines

Dnyanada Ramtirthkar Father Condition On Smoking Scene ; Dnyanada Ramtirthkar : ‘मी तुला धुम्रपान करायला शिकवतो पण…’ , ज्ञानदाच्या वडिलांनी ठेवलेली अट; काय होता नेमका किस्सा?


Dnyanada Ramtirthkar Father Condition : अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या वडिलांच्या अटीचा एक किस्सा सांगितला.

dnyanda ramtirthkar
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मराठी मालिका विश्वात अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर ही एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने आजवर वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सध्या ती स्टार प्रवाह वरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत काव्या देशमुख हे पात्र साकारते. यापूर्वीही अनेक उत्तम भूमिका साकारून ज्ञानदाने आपले नाव कमावले. केवळ मालिकांपुरत मर्यादित न राहता तिने सिनेमा, वेब सिरीज आणि नाटकांमध्येही अभिनय केला.

सध्याचा जमाना हा वेब सिरीजचा आहे. यामध्ये बऱ्याच गोष्टी भडकपणे दाखवल्या जातात. अभिनय क्षेत्रात काम म्हटलं की कलाकारांना अनेक गोष्टी या त्यांच्या मना विरोधात जाऊन केवळ कथेची गरज म्हणून कराव्या लागतात. बरेचदा अभिनेत्री यामध्ये भरडल्या जातात. टीव्हीवर किंवा सिनेमात इंटीमेट सीन्स किंवा धूम्रपणाच्या सीन्स वेळी त्यांना दडपणात काम करावे लागते कारण त्यावर येणाऱ्या घरच्यांच्या प्रतिक्रिया या सुद्धा महत्त्वाच्या असतात.
Maharashtra TimesJason Sanjay : CM थलापती विजय यांच्या मुलाला त्यांच्याच चाहत्याने केलेलं किडनॅप, आईवडिलांच्या घटस्फोटादरम्यान जुना व्हिडिओ व्हायरल
एका वेब सिरीज मध्ये ज्ञानदा रामतीर्थकर ला धुम्रपान करतानाचा सीन करायचा होता. यापूर्वी तिने कधीच सिगरेट ओढली नव्हती. आपण जर टीव्हीवर किंवा स्क्रीनवर सिगरेट ओढताना दिसलो तर आपल्या घरच्यांना काय वाटेल याची चिंता तिला वाटू लागली म्हणून तिने या सीन बाबत आपल्या घरच्यांशी बोलायचं ठरवलं. आजही ती कोणत्याही काम करताना त्या प्रोजेक्ट बद्दल पहिलं आपल्या घरच्यांना सांगते. त्यांच्या प्रतिक्रिया त्यावर काय आहेत हे तिच्यासाठी महत्त्वाचं असतं. जेव्हा तिने धूम्रपानाच्या सीन बद्दल सांगितलं तेव्हा तिच्या वडिलांनी तिला काही प्रश्न विचारले आणि समोर एक अट ठेवली.
Maharashtra TimesDevdatta Nage : देवदत्त नागेने डेविड वॉर्नरला भंडारा लावला, तोडक्या-मोडक्या मराठीत ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूची प्रतिक्रिया
ज्ञानगाचे बाबा तिला म्हणाले की हे वेब सिरीज वगैरे प्रकरण तर आम्हाला कळत नाही पण हा प्रोजेक्ट तुझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे असं तुला वाटतं? हे पात्र तुला आवडले का आता तुला काही मिळणार आहे का? असं विचारलं तेव्हा मी त्यांना हो असं म्हटलं. कारण त्यावेळी मैत्रीचा प्रकार अगदी नवीनच आलेला त्यामुळे मला त्यात काम करायचं होतं.

Onkar Raut Celebrity Corner : टाइमपास ते महाराष्ट्राची हास्यजत्रा…ओंकार राऊतसोबत खास गप्पा

बी द लाइटला दिलेल्या मुलाखतीत ज्ञानदाने पुढे सांगितले की, यावर मला माझ्या वडिलांनी सांगितलं की ठीक आहे कर तू पण धूम्रपान कसं करायचं हे मी तुला शिकवणार दुसऱ्या कोणाकडून तू शिकायचं नाहीस. हे घरात करायचं जे काही करायचं आहे ते तुला दुसरं कोणी नाही सांगणार. तुझं काम आहे आमच्या सगळ्यांचा तुला पाठिंबा आहे त्यामुळे माझ्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे.

ज्ञानदाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिला ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतून विशेष लोकप्रियता मिळाली. तसेच गेल्या वर्षी तिचा मुंबई लोकल हा सिनेमा रिलीज झाला.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.
आणखी वाचा