Headlines

Devendra fadnavis warning in mahayuti meeting message to avoid conflicts caused by opposing statements; वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे वाद, देवेंद्र फडणवीसांनी महायुतीच्या बैठकीत नेत्यांचे कान टोचले


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘राज्यात महायुतीतील घटक पक्षांनी एकमेकांच्या विरोधात प्रतिक्रिया देणे तसेच विसंगत भूमिका घेत एकमेकांवर टीकाटिप्पणी करणे टाळले पाहिजे. महायुतीची सामूहिक भूमिकाच जनतेसमोर गेली पाहिजे’, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत नेत्यांचे कान टोचले.

अनेकदा उत्तम समन्वय असूनही वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे अनावश्यक वाद निर्माण होतात. गैरसमजाचे वातावरण निर्माण होते, हे सर्व टाळले पाहिजे. तसेच, जिल्हा विकासनिधीचे वाटप ठरलेल्या ‘फॉर्म्युल्या’नुसारच व्हायला हवे, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक सोमवारी रात्री पार पडली. सन २०२४च्या विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेली ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादा भुसे, मंत्री उदय सामंत, मंत्री शंभूराज देसाई आदी उपस्थित होते.

या बैठकीत महामंडळांचे वाटप आणि नियुक्त्यांसोबतच जिल्हा विकासनिधी, महायुतीतील समन्वय आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेत महायुतीत अधिक समन्वय निर्माण करण्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष भर दिल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. राज्यातील तिन्ही पक्षांमध्ये, तसेच महायुतीमधील सर्व बारा घटक पक्षांमधील समन्वय अधिक मजबूत व्हावा, हा बैठकीचा प्रमुख उद्देश होता. सरकारच्या सर्व योजना आणि विकासकामे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी प्रभावीपणे पार पाडावी, यावरही चर्चा झाल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली.

निधीबाबत स्पष्ट सूचना

जिल्ह्यात पालकमंत्र्यांना निधीबाबतही स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. ७० टक्के निधी आमदारांना आणि ३० टक्के निधी पालकमंत्र्यांनी समन्वयातून वितरित करायचा आहे. तसेच, २०२४मध्ये ज्या पद्धतीने एकत्र समन्वयाने काम केले, त्याच पद्धतीने आगामी काळातही महाराष्ट्रातील सर्व निवडणुका, विकासकामे आणि जनतेशी संबंधित सर्व प्रश्नांवर आपण एकत्रितपणे काम केले पाहिजे. त्या दिशेने काम करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत