Dev Anand And Suraiya Love Story : देव आनंद यांच्या प्रेमात होती अभिनेत्री, पळून जाण्याचाही घेतलेला निर्णय; लव्हस्टोरीत आजी ठरली व्हिलन, आयुष्यभर राहिली सिंगल
Dev Anand And Suraiya Love Story : देव आनंद यांच्या प्रेमात होती अभिनेत्री, पळून जाण्याचाही घेतलेला निर्णय; लव्हस्टोरीत आजी ठरली व्हिलन, आयुष्यभर राहिली सिंगल
Suraiya Love Story : देव आनंद आणि अभिनेत्री सुरैया एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. पण, अभिनेत्रीच्या आजीनं त्यांच्या लग्नामध्ये मोडता घातला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – सुरैया आणि देव आनंद यांची लव्हस्टोरी ही बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध प्रेमकथांपैकी एक आहे. या लव्हस्टोरीमध्ये एकाने दुसऱ्याचा जीव वाचवला, अंगठी घेण्यासाठी पैसे उधार घेतले, गुपचूप प्रेमपत्रं पाठवली आणि अगदी आपल्या कुटुंबांच्या विरोधातही गेले, तरीही त्यांचं प्रेम अपूर्णच राहिलं.
देव आनंद यांनी सुरैयाचा जीव वाचवलेला
‘विद्या’ (१९४८) या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुरैया आणि देव आनंद एकमेकांच्या प्रेमात पडले. शूटिंगदरम्यान त्यांची बोट उलटल्यावर देव आनंद यांनी सुरैयाला बुडण्यापासून वाचवलं. त्यावेळी सुरैया बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या स्टार्सपैकी एक होती, तर देव आनंद हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचं नाव कमावण्याचा प्रयत्न करत होते. देव आनंद आणि सुरैया यांनी अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. देव आनंद यांनीही त्यांच्या आत्मचरित्रात या लव्हस्टोरीचा उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिलं आहे की, सुरैयानं त्यांना पहिल्यांदा स्पर्श करताच, आपलं तिच्यावर प्रेम आहे हे त्यांना जाणवलं. पण जसे बॉलिवूड चित्रपटांमध्ये खलनायक असतात, तसेच खऱ्या आयुष्यातही खलनायक असतात. सुरैयाची आजी या प्रेमाची शत्रू बनली. वेगळ्या धर्माच्या व्यक्तीशी होणाऱ्या लग्नाला तिचा विरोध होता. नंतर, देव आनंद यांनी सुरैयाला ३,००० रुपयांची हिऱ्याची अंगठी देऊन लग्नाची मागणी घातली.
नखरेल मराठी तारकांचा माज असा उतरवतो, Mahesh Tilekar यांची सनसनाटी मुलाखत
या जोडप्यानं सात चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. सुरैयाच्या आजीनं दोघांवर बारीक लक्ष ठेवायला सुरुवात केली, तेव्हा जोडपं एकमेकांना त्यांच्या सहकलाकारांमार्फत गुपचूप प्रेमपत्रं पाठवू लागले. ‘जीत’ (१९४९) या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, देव आनंद आणि सुरैया यांनी पळून जाऊन लग्न करण्याची योजना आखली होती, पण सुरैयाच्या आजीला याबद्दल कळलं आणि तिनं ऐनवेळी लग्न थांबवलं. या प्रेमकथेचा शेवट दुःखद झाला. Savita Malpekar : 10 दिवस लेक कोमात, डॉक्टरांनीही आशा सोडलेली; सविता मालपेकर यांनी सांगितला प्रसंग, आलेली स्वामींची प्रचिती वृत्तानुसार, सुरैयाच्या आजीनं साखरपुड्याची अंगठी समुद्रात फेकून दिली आणि सुरैयानं आयुष्यभर लग्न केलं नाही. मात्र, देव आनंद यांनी कल्पना कार्तिकशी लग्न केलं.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा