Headlines

Dev Anand And Suraiya Emotional Story : ‘डोळ्यात अश्रू, गालाला स्पर्श’, ब्रेकअपनंतर अनेक वर्षांनी सुरैय्या देव आनंद यांच्या समोर, सेक्रेटरीनं सांगितला भावूक किस्सा


Dev Anand And Suraiya: देव आनंद यांचे मॅनेजर अशोक सिन्हा यांनी देव आनंद आणि सुरैया यांच्याबद्दल भाष्य केलं आहे.

Dev Anand And Suraiya Sad Story
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – बॉलिवूडमध्ये अशा अनेक लव्हस्टोरी आहेत, ज्यांचा आजही उल्लेख केला जातो. अशीच एक प्रेमकथा होती देव आनंद आणि सुरैया यांची. देव आनंद आणि सुरैया यांची अजरामर प्रेमकथा आजही लोकांच्या स्मरणात आहे. अशातच आता देव आनंद यांचे मॅनेजर अशोक सिन्हा यांनी देव आनंद आणि सुरैया यांचा एक भावूक किस्सा सांगितला आहे.

देव आनंद आणि सुरैया यांची अपूर्ण लव्हस्टोरी

आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला, देव आनंद त्यांची सह-अभिनेत्री सुरैयाच्या प्रेमात पडले. देव आनंद यांनी सुरैया यांना लग्नाची मागणीसुद्धा घातलेली. हे नातं आंतरधर्मीय असल्यामुळे सुरैयाच्या आजीनं या नात्याला मान्यता दिली नाही. यामुळे देव आनंद यांनी सुरैया यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. देव आनंद यांच्यासोबत नातं तुटल्यानंतर सुरैया यांनी आयुष्यभर लग्न न करण्याचा निर्णय घेतला, तर देव आनंद आपल्या आयुष्यात पुढे निघून गेले. ब्रेकअपनंतर ते दोघे पुन्हा कधीच भेटले नाहीत.

Celebrity Corner : प्रशांत दामलेंसह ‘शिकायला गेलो एक’ नाटकाच्या कलाकारांसोबत गप्पा

अनेक वर्षांनी जेव्हा एका कार्यक्रमात देव आनंद आणि सुरैया यांना पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा देव आनंद खूश नव्हते. याबद्दल देव आनंद यांचे मॅनेजर अशोक सिन्हा यांनी अलीकडेच विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. अशोक सिन्हा यांनी सांगितलं की, फिल्म सिटीमध्ये आयोजित एका कार्यक्रमादरम्यान देव आनंद यांना सांगण्यात आलं की, सुरैयाला त्यांना भेटायचं आहे. हा एक अत्यंत संवेदनशील विषय होता, त्यामुळे त्यांनी आधी देव आनंद यांची परवानगी घेतली. मात्र, देव आनंद यांनी सुरैयाला भेटण्यास नकार दिला. त्यावेळी देव आनंद खूप दुःखी झाले आणि कार्यक्रमात थांबण्याऐवजी ते लगेच निघून गेले.

Maharashtra TimesShalmali Kholgade : वयाच्या ३१व्या वर्षी मुस्लीम मुलासोबत लग्न, आई-वडिलांचीही संमती; शाल्मली म्हणाली, ‘प्रॉब्लेम फक्त समाजाला’
त्या दिवशी, प्रसिद्ध रेडिओ निवेदक अमीन सयानी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत होते. देव आणि अशोक पुरस्कार देण्यासाठी रंगमंचाजवळ थांबले होते, तेव्हा देव आनंद यांना सांगण्यात आलं की, ते सुरैयासोबत पुरस्कार प्रदान करणार आहेत. देव यांना धक्काच बसला आणि ते म्हणाले, ‘हे ठरवलेलंच नव्हतं.’ पुरस्कार प्रदान करण्यासाठी सगळी तयारी झालेली आणि घोषणेला काही क्षणच बाकी होते. पण देव आनंद यांनी कार्यक्रम थांबवला आणि म्हणाले की, हे शक्य नाही. हा एक डाव आहे.

Maharashtra TimesSridevi And Mithun Chakraborty : ‘तीन महिने ते एका विवाहित जोडप्याप्रमाणे एकत्र राहिले’, श्रीदेवी आणि मिथुन यांच्याबद्दलच्या दाव्याची चर्चा
संभाषण चालू असतानाच, सुरैया आली आणि देव आनंद यांच्या अगदी मागे उभी राहिली. तोपर्यंत त्या दोघांनी एकमेकांना कित्येक वर्षांपासून पाहिलं नव्हतं. देव आनंद मागे वळताच त्यांची नजर सुरैयावर पडली आणि अनेक वर्षांनंतर ते पुन्हा एकदा एकमेकांसमोर आले. अशोक म्हणाले की, ‘सुरैयाच्या चेहऱ्यावरचे भाव मी कधीच विसरू शकत नाही. तिच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले होते. देव आनंद यांच्या चेहऱ्यावरही तसेच भाव होते. काही क्षण दोघेही पूर्णपणे शांत राहिले. मग त्यांनी सुरैयाच्या गालाला स्पर्श केला आणि सहजच म्हणाले, ‘सुरैया…’. त्यानंतर दोघंही काहीच बोलले नाहीत.’

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा