Dev Anand And Zeenat Aman : देव आनंद यांनी झीनत अमान यांना प्रपोज करण्याचा निर्णय घेतलेला. मात्र, राज कपूर यांच्यामुळे देव आनंद यांनी माघार घेतली. या घटनेनंतर झीनत अमान आणि देव आनंद यांनी एका मासिकासाठी मुलाखत दिलेली. त्याबद्दल देव आनंद यांचे सेक्रेटरी अशोक सिन्हा यांनी एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – देव आनंद बॉलिवूडचे सुपरस्टार होते. अनेक मुली देव आनंद यांच्या प्रेमात होत्या. पण, ते झीनत अमान यांच्या प्रेमात होते. त्यांनी अभिनेत्रीला लग्नाची मागणी घालण्याचाही विचार केलेला. अशातच आता देव आनंद यांचे सेक्रेटरी यांनी अभिनेत्याच्या आणि झीनत अमान यांच्या अफेअरबद्दल भाष्य केलंय.
देव आनंद आणि झीनत अमान यांनी ‘हरे रामा हरे कृष्णा’ आणि ‘हीरा पन्ना’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. देव आनंद यांच्या ‘हरे रामा हरे कृष्णा’ मध्ये काम केल्यानंतर झीनत अमान रातोरात स्टार बनल्या. झीनत यांनी या चित्रपटात देव आनंद यांच्या बहिणीची भूमिका साकारली होती. पण, या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान देव आनंद झीनत अमान यांच्या प्रेमात पडले. मात्र, राज कपूर यांच्यामुळे देव आनंद यांनी झीनत यांना प्रपोज केलं नाही. याबद्दल देव आनंद यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलं आहे.
मुलाखतीदरम्यान देव आनंद यांचे सेक्रेटरी म्हणाले की, ‘देव आनंद यांनी जे आत्मचरित्रात म्हटलंय ते अगदी खरं आहे. फरझानाला झीनत अमान आणि देव आनंद यांची मुलाखत घ्यायची होती. तिनं मला सगळी व्यवस्था करण्यास सांगितली. त्यावर देव आनंद यांनीही होकार दिला. अगदी काहीच न झाल्यासारखं, झीनत अमान आणि देव आनंद मुलाखतीसाठी एकत्र आले.’
Girish Pardeshi | गिरीश परदेशी दहा वर्ष कुठे गायब होता? ‘या सुखांनो या’च्या हिरोशी गप्पा
‘सत्यम शिवम सुंदरम’ सिनेमानंतर झीनत अमान आणि देव आनंद यांनी पुन्हा एकत्र काम केलं नाही, याबद्दल बोलताना देव आनंद यांचे सेक्रेटरी म्हणाले की, ‘प्रेमप्रकरण असतं आणि त्यावरून वाद असता तर झीनत आणि देव आनंद यांनी एकत्र मुलाखत पण दिली नसती.’ विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीमध्ये देव आनंद यांचे सेक्रेटरी अशोक सिन्हा बोलत होते.
…म्हणून देव आनंद यांनी प्रपोज करण्याचा निर्णय मागे घेतला
देव आनंद यांनी लिहिलंय की, ‘मला झीनत अमानवरच्या प्रेमाची जाणीव झाली आणि मला तिला हे सांगायचं होतं! एका अत्यंत खास ठिकाणी प्रामाणिकपणे कबुली देणं, हे रोमँटिकच होतं. मी त्यासाठी ताजमहालची निवड केली, जिथे आम्ही एकदा एकत्र जेवलो होतो.’ देव आनंद यांनी त्यांच्या ‘रोमान्सिंग विथ लाईफ’ या आत्मचरित्रात लिहिलं आहे की, राज कपूरसुद्धा त्या पार्टीला उपस्थित होते आणि त्यांनी झीनत यांच्या खांद्यावर हात ठेवला होतं. झीनत आणि राज कपूर यांना बघून देव आनंद यांना राग आला. झीनत पूर्वीसारख्या राहिल्या नाहीत, असं देव आनंद यांना वाटलं आणि त्यांनी तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला. ‘त्या भेटीला माझ्या मनात काहीच अर्थ उरला नव्हता. मी शांतपणे निघून गेलो.’ असं देव आनंद यांनी लिहिलं आहे.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा