Headlines

CWG 2026: भाज्या विकल्या, ई-रिक्षा चालवली… कोण आहेत झंडू कुमार? राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी पहिले ब्रॉन्झ पदक जिंकणारे खेळाडू – cwg 2026 para-powerlifter jhandu kumar won a bronze medal at the commonwealth games


Jhandu Kumar Commonwealth Games 2026: कमी वजन असूनही तो जास्त वजन पेलत असल्याचे पाहून तेथील प्रशिक्षकांनी त्याला पॉवरलिफ्टिंगसाठी तयार करण्यास सुरुवात केली.

jhandu kumar
झंडू कुमार(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
वृत्तसंस्था, नवी दिल्ली: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅरा पॉवरलिफ्टर झंडू कुमार याने भारताचे पदकाचे खाते उघडले. बालपणी पोलिओमुळे आलेले अपंगत्व, घरी कमालीची गरिबी, वयाच्या दहाव्या वर्षापासून कुटुंबीयांना भाजीविक्रीसाठी मदत, अशा जीवनसंघर्षाचा भार पेलत या स्पर्धेत उतरलेल्या झंडू कुमारने ब्रॉन्झपदक पटकावले.

बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील हरनौत गावातील हा २८ वर्षी तरुण काही महिन्यांपूर्वी पहाटे चार वाजता उठून भाजीविक्री करीत असे. तो खासगी वाहनास लटकून २० किमीचा प्रवास करून बिहार शरीफ येथील भाजी मंडईमध्ये जात असे. या मंडईच्या परिसरात त्याची तीन चाकी गाडी उभी असे. बालपणी पोलिओमुळे अपंगत्व आल्याने सामोरे जावे लागलेल्या प्रतिकूल परिस्थतीशी संघर्ष करीत तो त्या गाडीवरून दिवसभर भाज्या विकत असे. खेळाच्या प्रेमापोटी तो सायंकाळी चार वाजता विक्री बंद करून प्रशिक्षणासाठी जात असे.

Maharashtra TimesAssam Flood: आसाममधील पुराचे 61 बळी; आतापर्यंत सात लाखांहून अधिक लोक बाधित, जनजीवन विस्कळित
घरात कमालीची गरिबी, दहा वर्षांचा असल्यापासून भाजी विकण्यासाठी कुटुंबीयांना मदत करावी लागल्याने शाळेत जाण्याचा प्रश्नच नव्हता. काही वर्षांपूर्वी त्याने दबंग चित्रपट पाहिला. पाय नसले, तरी आपण सलमानसारखी शरीरयष्टी बनवू शकतो, असा त्याने विचार केला. मित्रांच्या मोबाइलवर व्हिडिओ पाहून त्याने व्यायाम सुरू केला. त्यांच्याच मदतीने त्याने जिममध्ये जाण्यास सुरुवात केली.
Maharashtra TimesPralhad Joshi : प्रल्हाद जोशींकडे शिक्षण मंत्रालयाची धुरा; किती शिकले आहेत मोदी सरकारचे हे मंत्री?
स्पर्धेत सहभागी होण्यास सुरुवात केल्यानंतरही त्याने भाजीविक्री सुरूच ठेवली होती. मात्र, तो बसत असलेल्या जागेवर छापा पडला. त्याचे दुकान बंद करण्यात आले. त्यानंतर त्याने ई-रिक्षा चालवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पॉवरलिफ्टिंगचे आकर्षण कायम होते. राष्ट्रीय स्पर्धेत अपयश आले; मात्र प्रशिक्षकांनी गुणवत्ता हेरली. त्याला गांधीनगर येथील अकादमीत दाखल करून घेण्यात आले आणि त्याची प्रगती सुरू झाली आणि ती राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदकापर्यंत पोहोचली आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा