राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ स्पर्धेला उद्यापासून सुरूवात होत आहे. भारताचे संपूर्ण वेळापत्रक दिले असून गोल्डन बॉय नीरज चोप्रा, मीराबाई चानू आणि बोरगोहेन यांच्याकडून पदकाची अपेक्षा असणार आहे. भारताचा दबदबा असलेले खेळ नेमके का वगळण्यात आले? जाणून घ्या.

राष्ट्रकुलमध्ये कोणते खेळ वगळले? आणि का?
क्रिकेट, हॉकी, शुटींग, कुस्ती, डायविंग, बॅडमिंटन, बीच वॉलीबॉल, रोड सायकलिंग, माउंटेनबाइकिंग, रिदमिग जिमनास्टिक, स्क्वॅश, टेबल टेनिस, ट्रायथलॉन हे खेळा यंदाच्या स्पर्धेतून वगळले आहेत. याचं कारण म्हणजे राष्ट्रकुल स्पर्धा भरवताना यजमान देशाला कोणते खेळ असणार आणि कोणते नाही याची संपूर्ण अधिकार असतो. तसे सुरूवातीला ऑस्ट्रेलियाकडे यजमानपद होते मात्र बजेट वाढल्याने त्यांच्या सरकारने स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २०१४ मध्ये यजमानपद भूषवणाऱ्या स्कॉटलँडकडे पुन्हा एकदा यजमानपद आले. ही स्पर्धा कमी खर्चात पार पाडावी यासाठी त्यांनी काही खेळ वगळत स्पर्धेचे आयोजन करण्याच निर्णय घेतला आहे. २०३०मध्ये भारताकडे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन असणार आहे. अहमदबादमध्ये ही स्पर्धा होणार आहे.
Commonwealth Games: खुशखबर! 2030 राष्ट्रकुल स्पर्धेच्या यजमानपदी भारताची निवड, कोणत्या शहरात होणार स्पर्धा?
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ भारताचे संपूर्ण वेळापत्रक
२४ जुलै (शुक्रवार)
- बॉक्सिंग – प्रीती पवार (५४ किलो), जस्मिन लंबोरिया (५७ किलो), सुमित कुंडू (७० किलो).
- पॅरा पॉवरलिफ्टिंग – अशोक मलिक, परमजीत कुमार, सुमन देवी.
- इतर – महिलांच्या विशिष्ट वजनी गटांमधील सामने.
25 जुलै (शनिवार)
- 3×3 बास्केटबॉल: भारत विरुद्ध वेल्स
- कलात्मक जिम्नॅस्टिक्स – महिला संघ आणि पात्रता (प्रणती नायक, निष्का अग्रवाल)
- पोहणे – धक्षन शशिकुमार, चैतन्य कुलकर्णी
- बॉक्सिंग – परवीन हुड्डा, अरुंधती चौधरी, लोव्हलिना बोरगोहेन
२६ जुलै (रविवार)
- वेटलिफ्टिंग – ऋषिकांत सिंग (पुरुष ६० किलो), मीराबाई चानू (महिला ४८ किलो), एम राजा (६५ किलो).
- बॉक्सिंग – कपिल पोखरिया, नरेंद्र बेरवाल.
- व्हीलचेअर बास्केटबॉल – भारत विरुद्ध स्कॉटलंड.
27 जुलै (सोमवार)
- ॲथलेटिक्स – मुरली श्रीशंकर (लांब उडी), पूजा सिंग (उंच उडी), तेजस्वीन शंकर.
- पोहणे – साजन प्रकाश (200 मीटर बटरफ्लाय).
- वेटलिफ्टिंग – ज्ञानेश्वरी यादव, बिंद्याराणी देवी.
- इतर – महिला शॉट पुट फायनल.
26 जुलै (रविवार)
- वेटलिफ्टिंग – ऋषिकांत सिंग (पुरुष ६० किलो), मीराबाई चानू (महिला ४८ किलो), एम राजा (६५ किलो).
- बॉक्सिंग – कपिल पोखरिया, नरेंद्र बेरवाल.
- व्हीलचेअर बास्केटबॉल – भारत विरुद्ध स्कॉटलंड.
27 जुलै (सोमवार)
- ॲथलेटिक्स – मुरली श्रीशंकर (लांब उडी), पूजा सिंग (उंच उडी), तेजस्वीन शंकर.
- पोहणे – साजन प्रकाश (200 मीटर बटरफ्लाय).
- वेटलिफ्टिंग – ज्ञानेश्वरी यादव, बिंद्याराणी देवी.
- इतर – महिला शॉट पुट फायनल.
28 जुलै (मंगळवार)
- ऍथलेटिक्स – सीमा पुनिया (डिस्कस), मनजीत कौर (शॉट पुट).
- जलतरण – श्रीहरी नटराज (100 मीटर बॅकस्ट्रोक).
- रोइंग – नवनीत सिंग/दिनेश कुमार (पुरुष जोडी).
- वेटलिफ्टिंग – हरजिंदर कौर (६९ किलो).
- इतर – गुलवीर सिंग (10,000 मी).
29 जुलै (बुधवार)
- बोल्स – नवनीत सिंग/दिनेश कुमार
- महिला एकेरी – नयनमोनी सैकिया
- वेटलिफ्टिंग – संजना (७७ किलो), दिलवाग सिंग (९४ किलो)
- ॲथलेटिक्स – समरदीप गिल, तजिंदरपाल सिंग (शॉट पुट), अनिमेष कुजूर (२०० मीटर)
- जलतरण – आर्यन नेहरा, सुयश जाधव
30 जुलै (गुरुवार)
- ट्रॅक सायकलिंग – सेकॉन सिंग
- ऍथलेटिक्स – नीरज चोप्रा, रोहित यादव (भाला), तेजस्वीन शंकर.
- वेटलिफ्टिंग – मार्टिना देवी (+86 किलो), लवप्रीत सिंग (+110 किलो).
31 जुलै (शुक्रवार)
- ऍथलेटिक्स – मिश्र 4×400 मीटर रिले, तेजस्वीन शंकर.
- ट्रॅक सायकलिंग – दिनेश कुमार, रोजॉन यंगलेम.
- ज्युदो – अस्मिता डे, श्रद्धा चोपडे, यामिनी मौर्य आणि इतर विविध वजन श्रेणींमध्ये.
01 ऑगस्ट (शनिवार)
- ॲथलेटिक्स – शुभम जुयाल (शॉट पुट), प्रियांका गोस्वामी (रेस वॉक).
- जुडो: अरुण कुमार, उन्नती शर्मा, हर्ष तोकस आणि इतरांचा समावेश असलेल्या पदकाच्या फेऱ्या.
02ऑगस्ट (रविवार)
- पुरुष -१०० किलो (प्राथमिक फेऱ्या, उपांत्यपूर्व फेरी, उपांत्य फेरी आणि रिपेचेज): अवतार सिंग
- पुरुष +१०० किलो (प्राथमिक फेऱ्या, उपांत्यपूर्व फेरी, उपांत्य फेरी आणि रिपेचेज): यश घांघस
- जुडो: अवतार सिंग, यश घांघस.

