Headlines

CM Eknath Shinde admitted to Thane Private Hospital Health Update on Discharge; दगदग-धावपळीने अशक्तपणा, एकनाथ शिंदे रुग्णालयात, कशी आहे प्रकृती? हेल्थ अपडेट समोर


Eknath Shinde Health Update : सततची दगदग व धावपळीमुळे एकनाथ शिंदे यांना अशक्तपणा जाणवत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.

Eknath Shinde Health Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
विनित जांगळे, ठाणे : शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना शुक्रवारी रात्री उशिरा ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आता त्यांच्या प्रकृतीत काही प्रमाणात सुधारणा असून आज, शनिवार, सायंकाळीच त्यांना घरी सोडण्यात येईल, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. काळजी करण्याचं कोणतंही कारण नसून सततची दगदग व धावपळीने शिंदे यांना अशक्तपणा जाणवत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.

दगदग झाल्याने प्रकृती बिघडली

राज्याचे विधिमंडळ अधिवेशन सुरु असल्याने कामाच्या निमित्ताने शिंदे यांची धावपळ सुरु आहे. तसेच काही दिवसांपूर्वी राज्यात शिंदे यांच्या नेतृत्वात झालेले ऑपरेशन टायगर असो अथवा शिवसेनेचे (उबाठा) आमदार सचिन अहिर यांचा पक्षप्रवेश अशी दगदग शिंदे यांची सुरु होती.
Maharashtra TimesBandra East Deck : गरीबनगरची झोपडपट्टी हटवली, आता वांद्रे पूर्वेला 300 स्क्वेअर मीटरचा आधुनिक डेक, 700 प्रवाशांची क्षमता, गर्दीवर भन्नाट तोडगा

सायंकाळी डिस्चार्ज मिळणार

आठवड्याभरापासून सुरु असलेल्या संततधार पावसाने वातावरणात बदल झाला असून शिंदे यांना शुक्रवारी विधिमंडळ कामकाजाच्या दरम्यान ताप आला होता. त्यामुळे अशक्तपणा आल्याने शिंदे यांना तातडीने ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती ठीक आहे. त्यांच्यावर निष्णांत डॉक्टरांच्या टीमकडून उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून सायंकाळी त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

VIDEO | सरकारच्या निर्णयानंतर अण्णा हजारेंकडून आंदोलन स्थगित करण्याची घोषणा

शुभांगी पाटलांचा पक्षप्रवेश लांबला

एकनाथ शिंदे यांच्या प्रकृती अस्वास्थ्याचा परिणाम ठाण्यात शुक्रवारी नियोजित असलेल्या एका महत्त्वाच्या राजकीय कार्यक्रमावरही झाला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या धुळ्यातील उपनेत्या शुभांगी पाटील या शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता ‘गंगूबाई शिंदे हॉल’ येथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश करणार होत्या; मात्र एकनाथ शिंदे यांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलावा लागला.
Maharashtra TimesSiya Goyal : हे लग्न तर होणार नाहीये, पण तू आधार कार्डची कॉपी पाठव; सियाच्या डिलीटेड डेटात धक्कादायक चॅट्स, कोडवर्डही सापडले
त्यानंतर हा कार्यक्रम शुक्रवारी उशिरा पार पडला. मध्यरात्री सव्वा-दीडच्या सुमारास त्याची सांगता झाली. उपमुख्यमंत्री उपस्थित नसल्यामुळे, त्यांचे सुपुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शुभांगी पाटील यांचा पक्षात प्रवेश करून घेतला. विशेष म्हणजे, शुभांगी पाटील यांनी यापूर्वी ‘महाविकास आघाडी’च्या उमेदवार म्हणून नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवली होती.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा