Headlines

cm devendra fadanvis campaign for candidate anil dhanorkar; पंधरा वर्षांमध्ये विकासाच्या नावानं बोंबाबोंब; महिला मतदारांनी हाकललं, त्याच उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची सभा


Bhadrawati nagar parishad election: भद्रावती नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिल धानोरकर यांना महिलांनी प्रचारादरम्यान जाब विचारला होता. पंधरा वर्षांतील कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत महिलांनी धानोरकरांना धारेवर धरले होते. यासंबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

devendra fadanvis campaign for candidate anil dhanorkar
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
निलेश झाडे, चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिल धानोरकर यांना महिला मतदारांनी प्रचारादरम्यान धारेवर धरले. पंधरा वर्षांपासून प्रभागात काय विकास केला, असा जाब विचारत महिलांनी त्यांना जाब विचारला. या घटनेनंतर आता राज्याचे मुख्यमंत्री अनिल धानोरकर यांच्या प्रचारासाठी भद्रावतीत पोहोचले होते. या घटनेने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. धानोरकर हे दिवंगत आमदार बाळू धानोरकर यांचे मोठे बंधू असून, त्यांनी यापूर्वी भद्रावती नगर परिषदेत दहा वर्षे नगराध्यक्ष आणि पाच वर्षे उपाध्यक्षपद भूषवले आहे. मात्र, महिलांनी त्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांना जाब विचारला होता.

वेगवेगळ्या तीन राजकीय पक्षातील परिपक्व अनुभवाची गाठोली खांद्यावर असलेल्या अनिल धानोरकर यांनी भाजपचा दुपट्टा खांद्यावर टाकला.अनिल धानोरकर दिवंगत बाळू धानोरकर यांचे मोठे बंधू. चंद्रपूरचा राजकारणात धानोरकर परिवाराचे मोठे नाव आहे.याच परिवारातील अनिल धानोरकर यांना महिलांनी हाकलून लावल्याचा विडिओ पुढे आला होता. चंद्रपूरच्या राजकारणात या विडिओने खळबळ उडाली होती. इकडून तिकडे उडी मारलेल्या अनिल धानोरकर हे विधानसभा निवडणीकीत वंचितचे उमेदवार होते. मतदारांनी त्यांना चांगलंच आपटलं. आता ते भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. पंधरा वर्षांपूर्वी जसा वार्ड होता, आता तसाच आहे. तुम्ही काय केलं, असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला. अनिल धानोरकर भद्रावती नगर परिषधेत दहा वर्ष नगराध्यक्ष तर पाच वर्ष उपाध्यक्ष होते. ज्याला मतदारांनी हाकलून लावले त्यांचा प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री आज भद्रावतीत पोहोचले होते. ज्यांना जनतेचा पाठिंबा नाही त्यांचा प्रचारासाठी मुख्यमंत्री आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा धुरळा उडाला आहे.

Maharashtra Times‘वाल्मीक कराडला फाशी होत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही’, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा निर्धार

नेमकं काय घडलं?

निवडणूकीचे वातावरण तापले आहे. उमेदवारांचा घरभेटी, वॉर्ड भेटी वाढल्यात. प्रचारासाठी भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिल धानोरकर गवराळा प्रभागात गेले होते. ते गेले खरे मात्र येथे त्यांचा क्लास महिलांनी घेतला. मागील पंधरा वर्षात काय केलं? ते सांगा, अशी विचारांना केली. प्रश्नांचं घट्ट जाळं त्यांनी धानोरकरांवर फेकलं. यातून कशी बशी सुटका करून धानोरकर यांनी काढता पाय घेतला.

‘तुमच्या तोंडाला दारूचा वास’

यावेळी एकत्र आलेल्या महिलांनी धानोरकर यांना दारू दुकानावरूनही धारेवर धरले. दारूचे दुकान तुमचे. तुमच्या दुकानामुळे आमच्या मुलांचे भवितव्य उध्वस्त होत आहे. आताही आम्हाला तुमच्या तोंडाला दारूचा वास येत आहे.

‘चाळीस वर्ष झालीत, स्थिती जैसे थी’

एका महिलेने जाब विचारताना म्हटलं, मी चाळीस वर्षापूर्वी लग्न करुन आले. तेव्हा ज्या समस्या होत्या, त्या आजही कायम आहेत. रस्ते नाही, नाल्या नाहीत. स्वच्छता नाही. पावसाळ्याच्या दिवसात कुणी येवून बघत नाही. या प्रश्नांची उत्तर धानोरकर देऊ शकले नाहीत.

मुख्यमंत्र्यांवर नाराजी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चंद्रपूर जिल्ह्याशी फारच घट्ट नाते असून, त्यांचं प्राथमिक शिक्षण याच जिल्ह्यात झाले आहे. ते मुख्यमंत्री असले तरी वर्गमित्रांना विसरले नाहीत. आपला मुलगा म्हणून त्यांच्याकडे चंद्रपूरकर बघत असतात. मात्र ज्या व्यक्तीला येथील जनतेने हाकलून लावलं, त्यांच्याच प्रचारासाठी आज मुख्यमंत्री पोहोचल्याने त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा