Headlines

CJP च्या आंदोलनात मध्यस्थीसाठी भाजप सरकारनं जेपी नड्डांचीच निवड का केली? – how jp nadda became governments troubleshooter amid neet paper leak row


Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचे केंद्राकडून आश्वासन मिळाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी शुक्रवारी पहाटे २६व्या दिवशी आपलं उपोषण संपवलं. आपल्या एक्स पोस्टद्वारे सोनम वांगचुक यांनी याबद्दल माहिती दिली. त्यावेळी सरकार संसदेत नीट परीक्षा पद्धतीतील गोंधळावर चर्चा करून तोडगा काढणार यासह काही प्रमुख आश्वासनं लेखी स्वरूपात देण्यात आली. त्यानंतर वांगचुक यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा आणि जितेंद्र सिंग यांच्या उपस्थितीत सोनम वांगचुक यांनी उपोषण मोडलं. पण, या संपूर्ण घडामोडीत सर्वात मोठी चर्चा रंगली ती एका चेहऱ्याची! अमित शाह नाहीत, राजनाथ सिंह नाहीत… तर थेट जे. पी. नड्डा मध्यस्थीसाठी पुढे आले! भारतीय जनता पक्षात अमित शाह आणि राजनाथ सिंह यांच्यासारखे अनुभवी आणि आक्रमक नेते असतानाही, केंद्र सरकारने जे. पी. नड्डा यांच्यावरच ही जबाबदारी का सोपवली? नड्डा यांच्या निवडीमागे भाजपची नक्की काय ‘डोकॅलिटी’ होती? तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया…



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत