Headlines

CJP abhijeet dipke to launch new campaign nationwide after dharmendra pradhans resignation; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर CJP चा मास्टरप्लॅन! सप्टेंबरपासून नवी देशव्यापी मोहीम; अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा


सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा देण्यास भाग पाडत सरकारला नमवल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने आता आपल्या आगामी देशव्यापी रणनीतीची घोषणा केली आहे. “आमचा लढा केवळ एका राजीनाम्यापुरता मर्यादित नव्हता. येत्या सप्टेंबर महिन्यापासून CJP देशभरात ‘क्या बोलती पब्लिक’ ही विशेष मोहीम राबवून देशातील ६० टक्के तरुणांचे प्रश्न थेट केंद्रस्थानी आणणार आहे,” अशी माहिती CJP चे प्रमुख अभिजीत दीपके यांनी दिली आहे.

​पुढील आंदोलनाची आणि संघटनात्मक बांधणीची आखणी करताना CJP ने ‘जॉईन द मुव्हमेंट, जॉईन CJP’ हे नवे अभियान लॉन्च केले आहे. CJP चे नेते सौरभ दास यांनी पत्रकार परिषदेत अधिकृत ‘क्यूआर कोड’ जारी करत, देशातील जास्तीत जास्त तरुणांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. “आम्ही राजकीय पक्ष काढणार नसून, सरकारवर व राजकीय पक्षांवर सतत दबाव आणणारा ‘पब्लिक प्रेशर ग्रुप’ म्हणून गल्लीपासून दिल्लीपर्यंत काम करणार आहोत,” असं त्यांनी स्पष्ट केले.

​५ झोनमध्ये देशव्यापी संघटन; क्राउड फंडिंगचा निर्णय

CJP च्या नव्या रणनीतीनुसार संपूर्ण देशाची ५ मुख्य भागांत विभागणी करून संघटन बांधणी केली जाणार आहे.

– ​आशुतोष रांका यांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्ना सिंग यांच्याकडे कायदेशीर बाबींची जबाबदारी असेल, तर वैष्णवी गौर या धोरणात्मक निर्णय निश्चित करतील.

– आंदोलनासाठी लागणारा निधी हा कुठल्या बड्या राजकीय पक्षाकडून किंवा उद्योजकाकडून न घेता जनतेच्या सहभागातून गोळा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय CJP ने घेतला आहे.शिक्षणधंदा अन् बेरोजगारीविरुद्ध गावागावात लढासप्टेंबर महिन्यात ‘क्या बोलती पब्लिक’ मोहिमेत CJP ची टीम देशातील विविध राज्यांत आणि गावांत फिरून तरुणांशी संवाद साधणार आहे. “पहिली-दुसरीच्या मुलांची १-१ लाख रुपये फी, कॉलेजेसमध्ये २५ लाख रुपयांचा मॅनेजमेंट कोटा आणि पदव्या हातात असूनही डिलिव्हरी बॉय म्हणून काम करण्याची तरुणांची मजबुरी… या शिक्षणधंद्याविरोधात अन् बेरोजगारीविरोधात CJP आता थेट रस्त्यावर उतरून मोठा दबाव निर्माण करेल,” असा थेट इशारा अभिजीत दीपके यांनी दिला आहे.

शिक्षणधंदा अन् बेरोजगारीविरुद्ध गावागावात लढा

सप्टेंबर महिन्यात ‘क्या बोलती पब्लिक’ मोहिमेत CJP ची टीम देशातील विविध राज्यांत आणि गावांत फिरून तरुणांशी संवाद साधणार आहे. “पहिली-दुसरीच्या मुलांची १-१ लाख रुपये फी, कॉलेजेसमध्ये २५ लाख रुपयांचा मॅनेजमेंट कोटा आणि पदव्या हातात असूनही डिलिव्हरी बॉय म्हणून काम करण्याची तरुणांची मजबुरी… या शिक्षणधंद्याविरोधात अन् बेरोजगारीविरोधात CJP आता थेट रस्त्यावर उतरून मोठा दबाव निर्माण करेल,” असा थेट इशारा अभिजीत दीपके यांनी दिला आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत