Headlines

Chhavi Mittal : मासिक पाळीदरम्यान असह्य वेदना, कॅन्सरच्या औषधांचा दुष्परिणाम; लोकप्रिय अभिनेत्रीला करावी लागली शस्त्रक्रिया, दिली हेल्थ अपडेट


Chhavi Mittal : अभिनेत्री छवी मित्तलनं कॅन्सरच्या उपचारांसाठी घेतलेल्या औषधांमुळे त्रास झाला. त्यामुळे अभिनेत्रीला शस्त्रक्रिया करावी लागली. याबद्दल तिनं नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं आहे.

Chhavi Mittal On Her Surgery
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – प्रसिद्ध बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्री छवी मित्तल पुन्हा एकदा तिच्या प्रकृतीमुळे चर्चेत आहे. स्तनाच्या कर्करोगावर मात केल्यानंतर, अभिनेत्रीनं अलीकडेच गर्भाशयातील फायब्रॉइड्स काढण्यासाठी आणखी एक शस्त्रक्रिया करून घेतली. सोशल मीडियावर तिच्या आरोग्याविषयी माहिती देत छवीनं सांगितलं की, कर्करोगावरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या टॅमॉक्सिफेन या औषधाच्या दुष्परिणामांमुळे तिचे फायब्रॉइड्स वेगाने वाढले आणि त्यामुळे शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय उरला होता.

छवी मित्तलनं सांगितला प्रसंग

छवी मित्तलनं अलीकडेच तिच्या शस्त्रक्रियेनंतरच्या प्रकृतीबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे. अभिनेत्रीनं सांगितलं की, डॉक्टरांनी केवळ फायब्रॉइड्सच काढले नाहीत, तर तिच्या ओव्हरीतील डर्मॉइड सिस्टदेखील यशस्वीरित्या काढली. गर्भाशय आणि फायब्रॉइड्सच्या बायोप्सीचे रिपोर्टही नॉर्मल होते आणि त्यात कर्करोगाची कोणतीही चिन्हे आढळली नाहीत. लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रियेदरम्यान तिच्या पोटात कार्बन डायऑक्साइड गेल्यामुळे तिला त्रास होत आहे.कॅन्सरसारख्या गंभीर आजारातून बरी झाल्यानंतर वारंवार रुग्णालयात जाणं आणि शस्त्रक्रिया करणं, यामुळे मानसिक तणाव जाणवतो, असं अभिनेत्रीनं सांगितलं. जेव्हा जेव्हा तिला वाटतं की सर्व काही ठीक आहे आणि ती स्वतःला पुन्हा सावरण्याचा प्रयत्न करते, तेव्हा पुन्हा काहीतरी होतं, असं छवी म्हणाली.

छवी मित्तलने तिच्या व्हिडिओमध्ये कॅन्सर उपचारांच्या परिणामांबद्दलही सांगितलं. कॅन्सर उपचारांचे दुष्परिणाम सहसा उपचार संपल्यानंतर कमी होतात. पण, तिला टॅमॉक्सिफेन नावाचं औषध देण्यात आलं. सुरुवातीला तिला सांगण्यात आलं होतं की, या औषधाचे कोणतेही मोठे दुष्परिणाम होणार नाहीत, परंतु कालांतरानं तिला त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी ही लक्षणं सामान्य असल्याचं सांगून दुर्लक्ष केलं. परंतु नंतर तपासणी केली असता गर्भाशयात फायब्रॉइड असल्याचं समजलं. २० वर्षांपूर्वी, तिला फक्त १.२५ सेंटीमीटर आकाराची एक लहान गाठ होती. पण, टॅमॉक्सिफेन या औषधाच्या परिणामांमुळे, ती झपाट्यानं ७.२ सेंटीमीटरपर्यंत वाढली.

सरकारच्या कामांवर नाराजी ? मतदानानंतर बॉलिवूड कलाकार थेट बोलले!

जसजशी गाठ वाढत गेली, तसतसं छवीला मासिक पाळीच्या वेळी असह्य वेदना आणि रक्तस्त्राव होऊ लागला. या परिस्थितीत, डॉक्टरांकडे शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्याय नव्हता. पण जरी तिला औषधांचे दुष्परिणाम माहित असते तरी, तिनं ते औषध घेतलंच असतं, कारण स्तनाच्या कॅन्सरवर उपचार करण्यासाठी त्या औषधाचे फायदे दुष्परिणामांपेक्षा कितीतरी जास्त आहेत, असं छवी शेवटी म्हणाली.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा