Headlines

Chhattisgarh Tijanbai passed away; पंडवानी परंपरेची सम्राज्ञी


लोकांना तीजनबाईंचं सादरीकरण प्रचंड आवडलं. गावोगावी निमंत्रणं येऊ लागली. १९७१ मध्ये भिलाई महोत्सवातील सादरीकरणाने त्यांचं आयुष्यच बदललं. देशभरात त्यांचे कार्यक्रम होऊ लागले. दूरदर्शनवर त्या दिसू लागल्या.

Chhattisgarh Tijanbai passed away
छत्तीसगड तीजनबाई निधन(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
हातात एक तंबोरी. गळ्यात पारंपरिक माळ, पायात घुंगरांचं पैंजण. पान खाऊन रंगलेले ओठ, दात. काठापदराची साधीशी साडी नेसून तीजनबाई रंगमंचावर आल्या की प्रेक्षकांना थेट महाभारतात घेऊन जात. त्यांची तंबोरी कधी भीमाची गदा होई, कधी अर्जुनाचे धनुष्य. कधी त्या भीम होऊन पहाडी आवाजात दु:शासनाला ललकारत, तर कधी वस्त्रहरण झालेल्या द्रौपदीचा विलाप प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोहोचवत. हे सारं त्यांच्या निधनामुळे कायमचं शांत झालं. तीजनबाई छत्तीसगडच्या बहेलिया पारधी आदिवासी समुदायात जन्मल्या. आजोबा बृजलाल गावोगावी हिडून पंडवानी सादर करायचे.

पंडवानी म्हणजे महाभारतातल्या कथांचं छत्तीसगडी हिंदीमधलं सादरीकरण. छोटी तीजनबाई त्यांच्यामागे जाई. तेराव्या वर्षी त्यांनी पहिलं सादरीकरण केलं. वेदमती शैलीमध्ये महिलांनी जमिनीवर बसून पंडवानी सादर करायची असते, तर पुरुषांनी कापालिक शैलीत उभे राहून. तीजनबाईंनी ही परंपरा मोडीत काढली. त्यांनी आयुष्यभर उभं राहून पंडवानी सादर केली. त्यांनी वैयक्तिक आयुष्यात मोठे आघात सोसले. बाराव्या वर्षी झालेला बालविवाह टिकला नाही. मुलांना एकटीने कष्टाने वाढवलं. त्यांच्या समाजाने त्यांना वाळीत टाकलं होतं. त्या या सगळ्याला पुरून उरल्या.

लोकांना तीजनबाईंचं सादरीकरण प्रचंड आवडलं. गावोगावी निमंत्रणं येऊ लागली. १९७१ मध्ये भिलाई महोत्सवातील सादरीकरणाने त्यांचं आयुष्यच बदललं. देशभरात त्यांचे कार्यक्रम होऊ लागले. दूरदर्शनवर त्या दिसू लागल्या. १९८५ मध्ये पॅरिसमधील भारत महोत्सवात त्या झळकल्या. अनेक देशांत त्यांनी पंडवानी पोहोचवली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी पंडवानी पाहून त्यांचं मनापासून कौतुक केलं होतं. पद्मश्री, पद्मभूषण पुरस्कारांनी गौरवलेल्या तीजनबाई कधी शाळेत गेल्या नव्हत्या; पण त्यांना खैरागड विद्यापीठाची डीलिट प्राप्त झाली होती. मौखिक परंपरेमधून देशातील समृद्ध लोककला जपणाऱ्या अन् त्यात मोठी भर घालून ती जगभर पोहोचवणाऱ्या तीजनबाईंना भावपूर्ण आदरांजली.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा