Headlines

Chhatrapati Sambhajinagar: छत गळतंय, विद्यार्थी पाणी काढतायत; फुलंब्रीत ZP शाळेचं धक्कादायक वास्तव, शिक्षण विभागावर संताप – phulambri district talegaon zp school slab water lekage anger directed at education department


Chhatrapati Sambhajinagar News: तळेगावपुरतीच ही समस्या मर्यादित नसून फुलंब्री तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांची अवस्था बिकट आहे.

zp school
फुलंब्री शाळा(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री: ‘शाळेत या, शिकून मोठे व्हा’ असा संदेश देणाऱ्या शिक्षण विभागाची दुरवस्था तळेगाव (ता. फुलंब्री) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उघड झाली आहे. विद्यार्थ्यांच्या हातात वह्या-पुस्तके असण्याऐवजी वर्गात साचलेले पावसाचे पाणी काढण्यासाठी झाडू, खराटे आणि बादल्या दिसून आल्याने पालक व ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

फुलंब्री तालुक्यातील तळेगाव येथील पहिली ते सातवीपर्यंतच्या या शाळेत १६३ विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेत सात शिक्षक कार्यरत आहेत. मात्र, शाळेची इमारत अत्यंत जीर्ण झाली असून, पावसाळ्यात छताला गळती लागते. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक वर्गखोल्यांमध्ये पाणी साचले. त्यामुळे अभ्यास सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना बादल्यांच्या साह्याने पाणी बाहेर काढून वर्ग कोरडे करावे लागले.

Maharashtra TimesMarathwada Rain : मराठवाड्यातील 7 जिल्ह्यांमध्ये खूप कमी पाऊस, 929 धरणात केवळ 25 टक्के पाणीसाठा
निवेदने देऊनही कारवाई नाही
शाळेच्या दुरुस्तीसाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि शिक्षण विभागाकडे अनेकदा लेखी निवेदने दिली आहेत. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप शालेय समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब गव्हाड यांनी केला. ‘दरवर्षी पावसाळ्यात विद्यार्थ्यांना याच समस्येला सामोरे जावे लागते. गळक्या वर्गखोल्यांमुळे मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे,’ असेही त्यांनी सांगितले.

६८ शाळा नादुरुस्त
तालुक्यातील ६८ जिल्हा परिषद शाळांच्या इमारती गळक्या व नादुरुस्त असल्याची माहिती समोर आली आहे. निधीची कमतरता आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे हजारो विद्यार्थी असुरक्षित वातावरणात शिक्षण घेत असल्याचे चित्र आहे.

पाणी गळती होणाऱ्या प्रमुख शाळा :
पिंपळगाव गांगदेव, धनगरवाडी (धामणगाव), तळेगाव वाडी (उर्दू शाळा), मराठी शाळा (तळेगाव), तळेगाव उर्दू शाळा, वाहेगाव, शिववस्ती शाळा (निधोना), हिराजी वस्ती (निधोना), सिंदाडी वस्ती (पाल), कुडळे वस्ती शाळा, पानेवाडी उर्दू शाळा, बैरागीवाडी (बाबरा), बाबुळगाव खुर्द (बाबरा), हनुमान नगर वस्ती (पीरबावडा), गेवराई पायगा, भाकरखाणे वस्ती (वडोद बाजार), पीरबावडा मराठी शाळा, पुंडलिकनगर वस्ती (वडोद बाजार), वाघलगाव, कवीटखेडा आणि आळंद उर्दू शाळा यांसह अनेक शाळांचा यामध्ये समावेश आहे.
Maharashtra TimesDigital Arrest : IPS बोलत असल्याचं भासवलं, अटक करण्याची भीती दाखवत घाबरवलं, 12 लाखांनी गंडवलं
‘दुरुस्ती केव्हा होणार ?’
शाळा दुरुस्तीबाबत स्थानिक स्तरावरील किरकोळ कामे ग्रामपंचायतीकडून करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मोठ्या दुरुस्तीचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात दुरुस्तीची कामे कधी सुरू होणार, असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

दरवर्षी बजेटमध्ये शिक्षण क्षेत्रासाठी कोट्यवधींचा निधी मिळतो. तरीही सरकारी शाळांची अशी दुरवस्था… काय वाटतं तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की सांगा

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा