Chhatrapati Sambhajinagar Suvrana Hall Damini Squad Stops Marriage of Minor Girl; नवरदेव-नवरी स्टेजवर जाण्याच्या तयारीत, अचानक पोलिसांची एन्ट्री, वधू-वराला थांबवून लग्न रोखलं; छ.संभाजीनगरात काय घडलं?
Chhatrapati Sambhajinagar Suvrana Hall Damini Squad Stops Marriage of Minor Girl; नवरदेव-नवरी स्टेजवर जाण्याच्या तयारीत, अचानक पोलिसांची एन्ट्री, वधू-वराला थांबवून लग्न रोखलं; छ.संभाजीनगरात काय घडलं?
Chhatrapati Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दामिनी पथकानं एका अल्पवयीन मुलीचं लग्न रोखलं आहे.
संभाजीनगर सुवर्ण हॉल दामिनी पथक अल्पवयीन मुलीचं लग्न रोखलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : घरची गरिबी आणि बिकट आर्थिक परिस्थितीमुळे एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचं उरकलं जाणारं लग्न पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करत रोखलं आहे. सिडको एन-6 परिसरातील सुवर्ण सभागृहात हा बालविवाह पार पडत होता. मात्र, जिल्हा महिला व बालविकास विभागाची चाईल्ड हेल्पलाईन आणि पोलिसांच्या ‘दामिनी पथकानं’ ऐन मोक्याच्या क्षणी धाड टाकत हा विवाह रोखला आणि वधू-वरांच्या पालकांचे समुपदेशन करून त्यांच्याकडून बंधपत्र लिहून घेतलं.
लग्नमंडपात पोहोचलेल्या पोलिसांनी वधू आणि वराच्या वयाची कागदपत्रे तपासली. त्यात मुलगी अल्पवयीन असल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी तत्काळ विवाहसोहळा थांबवून दोन्ही बाजूंच्या कुटुंबीयांना एकत्र केलं. त्यांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याची कडक माहिती देऊन अल्पवयीन मुलीचं लग्न लावणं हा कसा गंभीर गुन्हा आहे, याची जाणीव करून दिली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही कुटुंबांकडून भविष्यात मुलगी 21 (किंवा कायद्यानुसार 18) वर्षांची होईपर्यंत लग्न लावणार नाही, असं बंधपत्र लिहून घेतलं.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा