Headlines

Chhatrapati Sambhajinagar Sillod Minor Sister Assault by Cousin she became Pregnant Incident Revealed; चुलत भावाकडून अल्पवयीन बहिणीवर वारंवार अत्याचार, फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन शेतात संतापजनक कृत्य; गरोदर राहिल्यानं पाप उघड


Chhatrapati Sambhajinagar Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

Minor Sister Assault by Cousin
चुलत भावाकडून अल्पवयीन बहिणीवर अत्याचार(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : बहीण-भावाच्या पवित्र अशा नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. एका 25 वर्षीय नराधम तरुणाने आपल्याच 13 वर्षांच्या अल्पवयीन चुलत बहिणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला असून, सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी आरोपी नराधम भावाविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

नेमकी घटना काय?

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, 25 वर्षीय आरोपी भावाने 13 वर्षीय चुलत बहिणीला शेतात नेऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. हे कृत्य कोणाला सांगू नये, यासाठी आरोपीने तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला तोंड न उघडण्यास भाग पाडलं होतं. भीतीपोटी अल्पवयीन पीडित अल्पवयीन मुलगी हा सर्व त्रास सहन करत गप्प राहिली.
Maharashtra TimesThane Crime : फेसबुकवरुन ओळख, प्रेमसंबंधात चारित्र्यावर सतत संशय, ठाण्याच्या लॉजमध्ये गर्लफ्रेंडला संपवलं; कर्मचाऱ्यांनी खोलीत जाऊन बघताच थरारक दृश्य

पोट दुखू लागल्यानं रुग्णालयात नेले अन् पाप उघड झालं

काही दिवसांनंतर मुलीचं अचानक पोट दुखू लागल्यानं तिच्या आईने तिला तपासणीसाठी डॉक्टरांकडे नेलं. त्यावेळी वैद्यकीय तपासणीत मुलगी गर्भवती असल्याचं निदान झालं, ज्यामुळे तिच्या आईसह कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. घाबरलेल्या आईने मुलीला प्रेमाने विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, तिने चुलत भावाने तिच्यावर केलेल्या अत्याचाराची सर्व कहाणी कथन केली.

सिल्लोड ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल

भावाचा हा संतापजनक प्रताप ऐकून हादरलेल्या कुटुंबीयांनी क्षणाचाही विलंब न लावता सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण म्हणजेच पोक्सो कायद्यासह विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील कसून तपास करत आहेत.
Maharashtra TimesBadlapur Crime : दिव्यांग असल्यामुळे नवरा अंथरुणावर, साडी न दिल्यानं बायकोचा राडा, चिमुकल्यासमोर बापालाच संपवलं; आईच्याविरोधात लेकरानं जबाब दिला
(टीप : पीडित मुलगी अल्पवयीन असल्यानं व आरोपी तिचा चुलत भाऊ असल्यानं, कायद्यानुसार पीडितेची ओळख गुप्त ठेवण्यासाठी आरोपीचं नाव प्रसिद्ध केलेलं नाही.)