Chhatrapati Sambhajinagar Husband Killed in Hotel : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
रांजणगाव वेलकम हॉटेल पतीची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : गेल्या चार वर्षांपासून विभक्त राहणाऱ्या पतीने, आपल्या पत्नीवर विश्वास ठेवून भेटीसाठी जाणे त्याच्या जीवावर बेतल्याची अत्यंत खळबळजनक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगाव पोळ परिसरात घडली आहे. पडेगाव येथे राहणाऱ्या पत्नीने पतीला भेटण्याच्या बहाण्याने एका हॉटेलमध्ये बोलावून घेतले आणि त्यानंतर तिथे त्याची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या धक्कादायक हत्याकांड प्रकरणी मृताची पत्नी आणि तिचा मामा या दोघांवर हत्येचा थेट संशय व्यक्त करण्यात येत असून, पोलिसांनी या प्रकरणी वेगाने तपास सुरू केला आहे.
नेमकी घटना काय?
जाबीर रफीक शेख (वय 36, रा. लोणी बुद्रुक, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) असं पतीचं नाव आहे. जाबीर आणि शब्बो उर्फ शबाना जाबीर शेख (रा. पडेगाव, छत्रपती संभाजीनगर) यांचा विवाह 15 वर्षांपूर्वी पार झाला होता. सुरुवातीचे काही वर्ष संसार सुरळीत चालल्यानंतर, दोघांमध्ये कौटुंबिक कारणांवरून सातत्याने वाद आणि मतभेद होऊ लागले. या वादांमुळे गेल्या चार वर्षांपासून दोघेही एकमेकांपासून वेगळे राहत होते. CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर झाले आरोग्यदूत, देशभरातून वैद्यकीय मदत, शारीरिक ते मानसिक आधार शबानाने पती जाबीरला भेटण्याच्या अन् चर्चेच्या उद्देशाने रांजणगाव पोळ शिवारातील ‘वेलकम हॉटेल’मध्ये बोलावून घेतलं. जाबीर सोमवारी 20 जुलै रोजी सकाळी आपल्या घरातून निघाला होता. शबाना भेटल्यानंतर दोघेही हॉटेलच्या रुममध्ये गेले. काही वेळातच तिथे शबानाचा मामा कलीम मेहमूद पठाण (रा. सोनेसांगवी, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) हा देखील पोहोचला. त्यानंतर शबाना आणि कलीम हे दोघे हॉटेलमधून निघून गेले. मात्र, सकाळी 10:15 वाजेच्या सुमारास ते मंगळवारी 21 जुलै रोजी पहाटे चार वाजेच्या दरम्यानच्या कालावधीत हॉटेलच्या रुममध्ये जाबीरवर गंभीर हल्ला चढवून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. जाबीरचा इतक्या क्रूरपणे आणि निर्दयतेने खून का करण्यात आला, यामागील मूळ कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. Weather Update: पुण्यात पावसाने मोडला १२ वर्षांचा विक्रम, घाटांमध्ये ‘रेड अलर्ट’; चार दिवस राज्यात पाऊस थैमान घालणार
असा सुरू झाला तपास
जाबीर अचानक गायब झाल्यानं आणि त्याच्याशी संपर्क होत नसल्यानं, त्याचे काका सज्जाक तय्यब शेख (वय 60, रा. लोणी खुर्द, ता. राहता, जि. अहिल्यानगर) यांनी सुरुवातीला अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, तपासादरम्यान ही घटना शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचं स्पष्ट झालं. सध्या शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पथक या दुहेरी संशयितांचा शोध घेत असून, हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज आणि संशयितांचे मोबाईल लोकेशन खंगाळण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा