Headlines

chhatrapati sambhajinagar police recruitment aspirant harassed on road court sends accused to jail ; पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीला दुचाकी आडवी लावली, छत्रपती संभाजीनगरमध्ये पहाटेच्या अंधारात संतापजनक प्रकार


Chhatrapati Sambhajinagar News : पोलीस भरतीच्या सरावावरून परतणाऱ्या तरुणीसोबत भररस्त्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. स्कूटी अडवून तरुणीचा विनयभंग त्यानंतर पुन्हा पाठलाग आणि अखेर नागरिकांच्या मदतीने आरोपी पकडला गेला. नेमकं काय घडलं?

Chhatrapati Sambhajinagar Crime
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : पोलीस भरतीचा सराव करून दुचाकीने घरी परतणाऱ्या एका २० वर्षीय तरुणीचा पाठलाग करून, भररस्त्यात तिची स्कूटी अडवून विनयभंग करणाऱ्या विकृत तरुणाला न्यायालयाने जोरदार दणका दिला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गोरवाडे यांनी या प्रकरणाचा निकाल देत आरोपीला ३ महिन्यांचा कारावास आणि ५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. गगन तफज्जुल गगन अनिस वय २०, रा. सेवन हिल्स असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

भररस्त्यात स्कूटीसमोर आडवी लावली दुचाकी

या प्रकरणातील पीडित तरुणी पोलीस भरतीची तयारी करत होती. ३० जून २०२५ रोजी पहाटे ती टीव्ही सेंटर चौकातील पॉवर हाऊस मैदानावर सरावासाठी गेली होती. सकाळी ७ वाजेच्या सुमारास ती दुचाकीवरून घरी परतत असताना, विद्यानगर परिसरात आरोपी गगन अनिसने त्याची दुचाकी तिच्या स्कूटीसमोर आडवी लावली. त्यानंतर तुम्ही खूप भारी दिसताय, लव्ह यू असे म्हणत त्याने पीडितेच्या मांडीला जबरदस्तीने हात लावून विनयभंग केला. तरुणीने आरडाओरडा करून विरोध केल्यावर आजूबाजूचे नागरिक जमा होऊ लागल्याचे पाहून आरोपी तिथून पळाला. मात्र, काही अंतरावर त्याने पुन्हा तिचा पाठलाग सुरू केला, तेव्हा तरुणीने पुन्हा आरडाओरडा केल्याने धावून आलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून चांगलाच चोप दिला.

Maharashtra TimesPune Metro: पुणेकरांसाठी थेट विमानतळापर्यंत मेट्रो! नवा मार्ग ठरला; संपूर्ण शहरातील प्रवाशांना फायदा होणार

पंधरा दिवसांपूर्वीही केला होता विनयभंग….

डायल ११२ वर माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले. तपासात समोर आले की, आरोपीने या घटनेच्या पंधरा दिवसांपूर्वीही अशाच प्रकारे तरुणीचा रस्ता अडवून तिच्या अंगाला जबरदस्तीने हात लावत विनयभंग केला होता. मात्र, त्यावेळी भीतीपोटी तरुणीने कोणाकडेही याची वाच्यता केली नव्हती. अखेर या जाचाला कंटाळून तिने पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

अशी सुनावण्यात आली शिक्षा….

पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी तथा उपनिरीक्षक विनोद भालेराव यांनी या प्रकरणात तातडीने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सहाय्यक लोकाभियोक्ता राजू पहाडिया यांनी तीन साक्षीदारांचे जबाब नोंदवून सरकार पक्षातर्फे मजबूत बाजू मांडली. तर पैरवी अधिकारी म्हणून हवालदार सय्यद मुख्तार यांनी काम पाहिले. साक्षीदार आणि पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला थेट कारावासाची शिक्षा सुनावली

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा