US Attacks Ships: अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचा थेट फटका भारताला बसू लागला आहे. आतापर्यंत युद्धाची झळ इंधनाच्या वाढत्या दरांपर्यंत मर्यादित होती. यानंतर आता अमेरिकेनं भारतीय कर्मचारी असलेल्या जहाजांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
वॉशिंग्टन: अमेरिकेनं इराण विरुद्ध सुरू पुकारताच त्यांच्या नौदलाच्या युद्धनौकेवर हल्ला केला होता. हिंदी महासागरात अमेरिकेनं इराणी युद्धनौका IRIS डेनाला जलसमाधी दिली. विशेष म्हणजे ही युद्धनौका भारताच्या बंदरातून युद्धसराव आटपून निघाली होती. अमेरिकेनं भारतापासून हाकेच्या अंतरावर इराणी युद्धनौका बुडवली. आता परिस्थिती त्याहून गंभीर बनली आहे. अमेरिकेनं होर्मुझच्या सामुद्रधुनीत भारतीयांना थेट लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. ओमानच्या किनाऱ्यांपासून जवळ गेल्या तीन दिवसांत अमेरिकेनं दोन जहाजांवर हल्ले केले. या जहाजांवरील कर्मचारी भारतीय होते. त्यामुळे भारत-अमेरिका यांच्यातील संबंध आणि क्वॉड सहकार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
अमेरिकन नौदलानं बुधवारी २४ भारतीय कर्मचारी असलेल्या सेटेबेलो नावाच्या तेल टँकरवर भीषण हल्ला केला. या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये २३ वर्षीय खलाशी आदित्य शर्माचाही समावेश आहे. हल्ल्यानंतर भारतानं अमेरिकेच्या कृतीबद्दल संताप व्यक्त केला. फॉरवर्ड सिमेन्स यूनियन ऑफ इंडियाचे (FSUI) सचिव मनोज यादव यांनी अमेरिकेचे दावे खोडून काढले आहेत. मॅरिवॅक्स आणि सेटेबेलो जहाजांवरील कर्मचाऱ्यांनी सूचनांचं पालन केलं नव्हतं, असा दावा अमेरिकेनं केला होता. हा दावा खोटा असल्याचं यादव म्हणाले आहे. कर्मचाऱ्यांना रेडिओवरुन कोणतीही सूचना किंवा इशारा देण्यात आलेला नसल्याचं यादव म्हणाले. US Attack Oil Tanker: हल्ला झालाय, आग लागलीय, जहाज बुडतंय! USच्या हल्ल्यानंतर 24 भारतीय संकटात, मदतीसाठी SOS कॉल सेटेबेलो हल्ल्यानंतर २१ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात आलं. तर तिघांचा मृत्यू झाला आहे. मॅरिवॅक्स जहाजावर हल्ला झाल्यानंतर दोनच दिवसांनी सेटेबेलोवर हल्ला झाला आहे. मॅरिवॅक्सवरील सर्वच्या सर्व २४ भारतीय कर्मचाऱ्यांची सुखरुप सुटका करण्यात आली.
अमेरिकेनं तीन दिवसांत दोनदा भारतीयांना थेट लक्ष्य केलं आहे. विशेष म्हणजे भारतीय खुलाशांच्या मृत्यूबद्दल अमेरिकेनं साधा खेदही व्यक्त केलेला नाही. अमेरिकन नौदलानं दु:ख व्यक्त करण्याऐवजी आपली कृती योग्यच असल्याचं ठामपणे म्हटलं आहे. त्यामुळे हिंदी महासागर आणि आसपासच्या परिसरातील क्वॉड सहकार्य, भारत-अमेरिकेतली करारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. Oman Gujarat Pipeline: होर्मुझ संकटातून धडा, भारतानं रामबाण उपाय शोधला; 30 वर्षे रखडलेल्या प्रकल्पाला अखेर चालना संयुक्त राष्ट्रातील भारताचे प्रतिनिधी पी. हरिश यांनी व्यावसायिक जहाजांवर सुरू असलेल्या हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ‘या हल्ल्यांमध्ये अनेक भारतीयांचा जीव गेला आहे. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प व्यावसायिक जहाजांवरील अमेरिकेच्या हल्ल्यांबद्दल अभिमानानं बोलत आहेत. या हल्ल्यांकडे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकन सैन्याचं यश म्हणून पाहात आहेत,’ अशा शब्दांत हरीश यांनी तीव्र नाराजी बोलून दाखवली.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.
पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.
मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.
‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.
टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.
लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.
लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.
२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.
शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा