Chhatrapati Sambhajinagar Mitmita Area Raid Baba Don House Cash Worth Crores of Rupees Found; 90च्या दशकात शहरात मोठी दहशत, महिनाभरापूर्वी मृत्यू, छ.संभाजीनगरमधील ‘बाबा’ डॉनच्या घरी छापा; मोठं घबाड सापडलं
Chhatrapati Sambhajinagar Mitmita Area Raid Baba Don House Cash Worth Crores of Rupees Found; 90च्या दशकात शहरात मोठी दहशत, महिनाभरापूर्वी मृत्यू, छ.संभाजीनगरमधील ‘बाबा’ डॉनच्या घरी छापा; मोठं घबाड सापडलं
Chhatrapati Sambhajinagar Raid on Baba Don House : 90च्या दशकात संभाजीनगर शहरासह आसपासच्या परिसरात स्वतःची मोठी दहशत निर्माण करणाऱ्या एका तथाकथित ‘डॉन’च्या आलिशान बंगल्यावर पोलीस गुन्हे शाखेने अचानक छापा टाकला आहे.
संभाजीनगर बाबा डॉन घर छापा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : शहरात 90च्या दशकात आपली दहशत आणि मोठा दबदबा निर्माण करणाऱ्या एका तथाकथित डॉनच्या आलिशान बंगल्यावर गुन्हे शाखेनं अत्यंत गोपनीय पद्धतीने धडक छापा टाकला आहे. शहरातील मिटमिटा भागातील या बंगल्यात तब्बल 21 तास चाललेल्या या मॅरेथॉन कारवाईत दोन खोल्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची संशयास्पद बेहिशोबी रोकड आढळून आली आहे. या नोटांची मोजणी करण्यासाठी पोलिसांना चक्क पाचपेक्षा जास्त मशीन मागवाव्या लागल्या होत्या. या कारवाईमुळे संपूर्ण शहरात कमालीची खळबळ उडाली आहे.
कोट्यवधी रुपयांची रोख रक्कम
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा धडक छापा काल शुक्रवारी पहाटे 4 वाजता सुरू झाला होता आणि तो मध्यरात्री 1 वाजेपर्यंत, म्हणजेच सलग 21 तास सुरू होता. या मोहिमेत गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे पथक सामील होते. बंगल्याची झडती घेतली असता, तेथील दोन खोल्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची रोख रक्कम आढळून आली. यामध्ये सर्वाधिक 500 रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. रोख रकमेसोबतच मोठ्या प्रमाणावर सोन्या-चांदीचे दागिने आणि काही घातक शस्त्रे देखील जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या जप्तीबाबत अधिकृत दुजोरा देण्यास सध्या टाळाटाळ केली आहे. Omraje Nimbalkar : शिवसेना प्रवेशानंतर खा. ओमराजे निंबाळकर अॅक्शन मोडमध्ये, एकनाथ शिंदेंकडे मोठ्या मागण्या
महिनाभरापूर्वीच दीर्घ आजारपणामुळे त्याचे निधन झाले होते. त्याच्या मृत्यूनंतर अवघ्या महिन्याभरातच पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. या अत्यंत संवेदनशील कारवाईची माहिती बाहेर लीक होऊ नये, यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रचंड गोपनीयता राखण्यात आली होती. कारवाईच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून बाबाच्या सेवेत असलेल्या दोन विश्वासू कर्मचाऱ्यांना गुरुवारी 9 जुलै रोजी मध्यरात्री 12 वाजताच गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्यांच्या संपर्कातील एका महिलेचीही कसून चौकशी करण्यात आली.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा