Headlines

Chandrashekhar Bawankule: रिंगरोड चौकशी फेऱ्यात! अलाइन्मेंट बदलप्रकरणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश – chandrashekhar bawankule alleged nashik ring road alignment was changed due to political pressure


Chandrashekhar Bawankule: कुंभमेळ्याच्या नावाखाली रिंगरोडसाठी शेतकऱ्यांवर भूसंपादनाचा दबाव टाकला जात आहे. ४ मे रोजी जाहीर झालेल्या यादीत नसलेल्या जमिनींच्या सर्व्हे क्रमांकांचा नंतरच्या यादीत समावेश केला.

chandrashekhar bawankule
चंद्रशेखर बावनकुळे(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराबाहेर साकारल्या जाणाऱ्या बाह्य रिंगरोड अर्थात परिक्रमा मार्गातील भूसंपादनातील अनियमिततेचा वाद विधिमंडळात पोहोचला आहे. प्रकल्पाची अधिकृत घोषणा होण्याआधीच काही विशिष्ट लोकांनी जमिनी खरेदी केल्या आणि राजकीय दबावातून रिंगरोडचे ‘अलाइन्मेंट’ बदलल्याचा आरोप विधिमंडळात करण्यात आले. या गंभीर आरोपांची दखत घेत महसूल विभागाचे अपर मुख्य सचिवांमार्फत तीन दिवसांत चौकशी करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. यामुळे जमिनी खरेदी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

नाशिकच्या रिंगरोडबाबत आमदार सरोज अहिरे यांनी बुधवारी (दि. ८) विधिमंडळाबाहेर आंदोलन केले होते. त्यानंतर गुरुवारी (दि. ९) विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी रिंगरोड भूसंपादन प्रक्रियेत झालेल्या भ्रष्टाचाराचा प्रश्न उपस्थित केला.

Maharashtra TimesSuhas Kande On Bhujbal: भुजबळांच्या खात्यात घोटाळा! आमदार सुहास कांदेंचा गंभीर आरोप, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
काही बड्या व्यक्ती आणि कंपन्यांना आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठीच आराखडा बदलण्यात आला. जमिनीच्या मोजणीवेळी गरीब शेतकऱ्यांना घराबाहेर काढण्यात आले, तसेच काही ठिकाणी महिलांना धक्काबुक्की करण्यात आल्याच्या तक्रारीही त्यांनी मांडल्या. यात जिल्हाधिकारी कार्यालयाची भूमिका संशयास्पद असल्याने संबंधितांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

महसूल आणि पोलिस अधिकाऱ्यांनीच रस्त्यालगतच्या जमिनी आधीच खरेदी केल्या आणि त्यासाठी ‘अलाइन्मेंट’ बदलले, असा आरोप आमदार सरोज अहिरे यांनी केला. त्यांनी या प्रकरणात सचिन चिंतावार आणि संजय चहांदे यांच्यासह काहींची नावे घेतली हेाती.

कांदेंकडून भुजबळांच्या चौकशीची मागणी
मंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्यातील संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे. भुजबळांच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या धान्य वाहतुकीच्या चार हजार कोटींच्या निविदेत सहाशे कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करत आमदार कांदे यांनी विधिमंडळात आंदोलन केले आहे. माजी खासदार समीर भुजबळांवर गंभीर आरोप करत, या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी कांदेंनी केली आहे.

Maharashtra TimesMoushumi Chatterjee : अभिनेत्री मौशमी चॅटर्जींना दणका, नाशिकच्या निवृत्त डॉक्टरला मानसिक त्रासाची भरपाई द्या, ग्राहक आयोगाचे आदेश
जबरदस्तीने भूसंपादन नाही
कुंभमेळ्यासाठी रिंगरोड महत्त्वाचा असला तरी विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही. स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच भूसंपादन होईल. बाधितांना कायद्यानुसार योग्य आणि रास्त मोबदला दिला जाईल. प्रकल्पाची माहिती आधीच लीक करून ज्यांनी जमीन खरेदीचे गैरव्यवहार केले असतील, त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. ‘तीन दिवसांत चौकशी पूर्ण केली जाईल. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांवर दबाव आणला असेल किंवा महिलांशी गैरवर्तन केले असेल, तर त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल,’ अशी ग्वाही बावनकुळे यांनी सभागृहात दिली.

Maharashtra TimesMalegaon Farmer: मालेगावात शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन; लाखो रुपयांची फसवणूक, पोलिस अधिकाऱ्याची उचलबांगडी, प्रकरण काय?
घरपट्टी घोटाळाही चर्चेला
महापालिकेच्या नाशिकरोड व गांधीनगर कर भरणा केंद्रातील कर्मचाऱ्यांनी पासवर्डचा गैरवापर करत केलेला ४५ लाखांचा अपहार प्रकरण विधिमंडळात पोहचले आहे. चार वर्षांपूर्वी झालेल्या या अपहार प्रकरणात चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली नसल्याचे सांगत, आमदार नितीन पवार यांनी याबाबत विधिमंडळात ताराकिंत प्रश्न उपस्थित केला आहे. मार्च २०२२ मध्ये नाशिकरोड तसेच गांधीनगर येथील कर भरणा केंद्रातील सॉफ्टवेअरशी छेडछाड करून ४५ लाखांचा अपहार उघडकीस आला होता. त्यामुळे आज होणाऱ्या चर्चेकडे लक्ष लागून आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा