Chandrapur Mayor Election Uddhav Thackeay led Shiv Sena UBT Sandeep Girhe challenges MNS Sandeep Deshpande; “आम्हा कोणाकोणाला एक-एक कोटी मिळाले? संदीप देशपांडे नावं सांगा, राजीनामा टाकतो”; ठाकरेसेनेच्या नेत्याचा पलटवार
Chandrapur Mayor Election Uddhav Thackeay led Shiv Sena UBT Sandeep Girhe challenges MNS Sandeep Deshpande; “आम्हा कोणाकोणाला एक-एक कोटी मिळाले? संदीप देशपांडे नावं सांगा, राजीनामा टाकतो”; ठाकरेसेनेच्या नेत्याचा पलटवार
Chandrapur News : शिवसेनेच्या (उबाठा) नगरसेवकांना एक-एक कोटी रुपये देण्यात आले. शिवाय त्यांना वेगळ्या ऑफर दिल्या आहेत, असा आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला होता.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
चंद्रपूर : ‘आम्हाला कुणी पैसे दिले आणि कुणी घेतले त्यांची नावे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी जाहीर करावे. आम्हाला कुणी पैसे देऊन विकत घेतले असेल, तर माझ्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व नगरसेवक राजीनामा देतील’ असे जाहीर आव्हान ठाकरेसेनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांनी गुरुवारी दिले.
दुसरीकडे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही उबाठा पक्षावर शरसंधान साधले. ‘चंद्रपुरात शिवसेना (उबाठा) पक्षाने भाजपला पाठिंबा देऊन आघाडीचा धर्म पाळला नाही. काँग्रेसने मात्र परभणी महापौरपदाच्या निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळला आहे. परभणीमध्ये शिवसेना (उबाठा) पक्षाचा महापौर व काँग्रेसचा उपमहापौर झाला आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी, इंडिया आघाडी, मविआ, लोकशाही; तसेच संविधानासाठी काँग्रेसच्या सर्व १२ नगरसेवकांनी शिवसेना (उबाठा)ला मतदान केले,’ असे मत हर्षवर्धन सपकाळ यांनी गुरुवारी व्यक्त केले. Parbhani Mayor : परभणीच्या महापौरपदी ठाकरेसेनेचे इकबाल सय्यद, काँग्रेसच्या साथीने सत्ता, भाजप उमेदवाराचा पराभव सपकाळ पुढे म्हणाले की, ‘चंद्रपूर महानगरपालिकेत शिवसेना उबाठाने जी भूमिका घेतली त्याची सल असण्याची अथवा बदला घेण्याची भूमिका व संस्कृती काँग्रेसची नाही. चंद्रपूरसंदर्भात खासदार संजय राऊत यांच्याशी काँग्रेसच्या नेत्यांनी चर्चा केली होती. काँग्रेसचे नेते शिवसेना (उबाठा) पक्षाशी सातत्याने संपर्कात होते असे असताना राऊत व त्यांच्या पक्षातील लोकांनी जी वक्तव्ये केली ती चुकीची असून, आघाडी धर्माला शोभणारी नाहीत. वंचित बहुजन आघाडी हा काँग्रेसचा मित्र पक्ष आहे. त्यांचे दोन नगरसेवक गैरहजर राहिले. त्यांना पक्षाने बडतर्फ केले; तसेच शहराध्यक्षांवरही कारवाई केली; पण शिवसेना उबाठा पक्षाने कोणतीच कारवाई केली नाही. हे काँग्रेस पक्ष कदापि सहन करणार नाही’.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा