Headlines

Chandrapur Brother Killed Sister Over Property Dispute Mother Seriously Injured; भाऊ वडिलांसोबत तर बहिण आईसोबत वास्तव्यास, संपत्तीवरुन सतत वाद; सख्ख्या भावाने बहिणीला संपवलं


Chandrapur Brother Killed Sister : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच चंद्रपूरमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Chandrapur Brother Killed Sister
भद्राकाली भावाकडून बहिणीची हत्या(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सख्या भावानेच आपल्या बहिणीची धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्या केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात आई देखील गंभीर जखमी झाली आहे. भद्रावती शहरातील झाडे प्लॉट परिसरात ही घटना घडली आहे. सुरज शंकर भोंडे (वय 28) असं आरोपीचं नाव असून संजीवनी शंकर भोंडे (वय 32) असं मृत बहिणीचं नाव आहे. तर पुष्पा शंकर भोंडे (वय 58) असं गंभीर जखमी झालेल्या आईचं नाव आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

संपत्तीच्या वादातून हत्या

संपत्तीच्या वादातून ही घटना झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गेल्या तीन ते चार दिवसापासून घरात वाद सुरु होता. यात आई व बहीण हे स्वतंत्र राहत होते, तर भाऊ आणि वडील वेगळे राहत असल्याची माहिती मिळाली आहे. आज संध्याकाळी झालेल्या जोरदार वादानंतर हा सर्व प्रकार घडला. भद्रावती पोलिसांनी या प्रकरणी आरोपी भावाला अटक केली असून वडिलांना देखील ताब्यात घेतलं आहे. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
Maharashtra TimesAbhishek Kalamkar : नोकरी लावून देण्याचं आमिष, लॉजवर वारंवार अत्याचार; अभिषेक कळमकर यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल

बहिणीला कोयत्याने वार करून संपवलं

अशीच धक्कादायक घटना नालासोपारा येथे देखील घडली आहे. नालासोपारा शहरात धक्कादायक घटना घडली असून मनोरूग्ण भावाने बहिणीची हत्या केली आहे. तसंच या वादात मध्यस्ती करण्यासाठी गेलेली आईदेखील गंभीर जखमी झाल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. नालासोपारा पूर्वेच्या टाकीरोड येथील सर्वोदय वसाहतीत मंगळवारी पहाटे ही घटना घडली असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. वसई विरार शहरातील एकाच आठवड्यातील ही चौथी हत्या आहे.
Maharashtra TimesNagpur Crime : आई-वडिलांचं सतत भांडण, एकुलत्या एक लेकीच्या मनावर खोलवर परिणाम; नैराश्यात चिमुकलीचं टोकाचं पाऊल

मिळालेल्या माहितीनुसार, मनोरुग्ण भावाने आपल्या सख्ख्या बहिणीची कोयत्याने वार करून हत्या केली. त्यानंतर भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या आईवरही या तरुणाने हल्ला केला. टाकी रोड येथील सर्वोदय वसाहतीत साईधाम वेल्फेअर चाळ आहे. या चाळीत सुप्रिया कानडे ही ३५ वर्षीय महिला राहते. तिची आई आणि भाऊ शेजारीच राहतात. सुप्रिया कानडे यांचा पती गावी गेला होता. मंगळवारी पहाटे तिचा सख्खा भाऊ अजित मालुष्टे (वय 40) याच्यासोबत तिचे भांडण झाले. या भांडणात अजितने कोयत्याने तिच्यावर वार केला. तिच्या मानेवर आणि छातीवर कोयत्याचे वार झाल्याने ती गंभीर जखमी झाली.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात.आणखी वाचा