Headlines

Akola Dabki road murder case accused arrested ; ‘तू माझ्याकडे का पाहतोस?’; चहा टपरीवर वाद, तीन जणांचा हल्ला, 17 वर्षांच्या माविशचा जीव गेला


अकोल्यातील डाबकी रोड परिसरात किरकोळ वादातून १७ वर्षीय मुलाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. अकोला पोलिसांनी अवघ्या ६ तासांत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

Minor boy killed over minor dispute in Akola
अकोल्यात किरकोळ वादातून अल्पवयीन मुलाचा खून, आरोपींना अटक(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रियंका जाधव, अकोला : शहरामधील डाबकी रोड परिसरात गुरुवारी रात्री एका चहाच्या टपरीवर झालेल्या किरकोळ वादाचे पर्यावसान एका भीषण हत्येत झाले आहे. “तू माझ्याकडे काय पाहतोस?” या साध्या कारणावरून झालेल्या वादातून तीन जणांनी १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर चाकूने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केली. माविश मोहम्मद आझम असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अकोला पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या ६ तासांत तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास डाबकी रोड रेल्वे स्टेशन परिसरात घडली. मृत माविश हा एका चहाच्या टपरीवर उभा असताना तिथे उपस्थित असलेल्या अन्य काही तरुणांशी त्याचा शाब्दिक वाद झाला. आरोपींनी “तू माझ्याकडे का पाहतोस?” असे म्हणत माविशशी हुज्जत घातली. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपींनी माविशला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान एका आरोपीने धारदार चाकू काढून माविशवर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या माविशला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पोलिसांची जलद कारवाई

घटनेची माहिती मिळताच डाबकी रोड पोलीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेची चार विशेष पथके तयार करण्यात आली. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे, आरोपी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मार्गे मध्य प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून अवघ्या ६ तासांत तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

Maharashtra TimesPune News : 11 महिन्यांचा संसार, वेगवेगळ्या देशात नोकरी, जोडपं पुणे कोर्टात, लग्न जुळवणाऱ्या माऊलींनीच घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण केली

पोलीस अधीक्षकांचे आवाहन

या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक केल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “या घटनेचा तपास सुरू असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि शहरात शांतता राखावी.”

सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपींची पार्श्वभूमी तपासली जात आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा