Headlines

Central Railway: रोजची धक्काबुक्की बंद! आता कर्जत, खोपोलीसाठीही 15 डबा लोकल; स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर मध्य रेल्वेचा निर्णय, पाहा वेळापत्रक


Central Railway 15 Coach Local: १५ डब्यांच्या लोकलच्या वाढीमुळे काही फेऱ्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. दोन खोपोली-परेल लोकल आता खोपोली-दादर म्हणून धावणार आहे.

Anderson Phillip Catch - 2026-08-15T104333
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जतदरम्यान १५ डब्यांच्या २२ लोकल फेऱ्या वाढविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. आज, १५ ऑगस्टपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे प्रतिलोकल प्रवासी क्षमतेत सुमारे २५ टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. अंबरनाथ, बदलापूर, कर्जत आणि खोपोलीकडे ये-जा करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पंधरा डब्यांच्या २२ फेऱ्यांपैकी ११ फेऱ्या सकाळ आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत धावणार आहेत. सकाळी गर्दीच्या वेळेतील ८.२७ ची अंबरनाथ-सीएसएमटी लोकल आणि सकाळी १० ची खोपोली-कर्जत लोकल १५ डब्यांची होणार आहे. रात्री ७.४२ ची सीएसएमटी-अंबरनाथ आणि रात्री ७.५० ची सीएसएमटी-कर्जत लोकलची १५ डब्यांची करण्यात आली आहे. नव्या लोकल फेऱ्या वाढणार नसल्याने मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील एकूण उपनगरी लोकल फेऱ्यांची संख्या १,८२० इतकीच राहणार आहे.

Maharashtra TimesFDA Action : गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची बेकायदेशीर विक्री, नागपूर आणि सोलापुरात एफडीएची धाड, डॉक्टरसह आरोपींवर कारवाईसीएसएमटी-अंबरनाथची १५ डब्यांची लोकल आता दादरवरून अंबरनाथसाठी रवाना होणार आहे. ही लोकल दादरहून रात्री ११.२३ वाजता सुटून मध्यरात्री १२.३० वाजता अंबरनाथला पोहोचेल. देखभालीसाठी ही फेरी शनिवारी रद्द राहणार आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय रेल्वेत सर्वप्रथम १५ डब्यांच्या लोकलची सुरुवात १६ ऑक्टोबर २०१२ रोजी झाली. त्यावेळी १६ फेऱ्या सुरू करण्यात आल्या. ४ एप्रिल २०१९ रोजी आणखी सहा फेऱ्यांची भर पडल्याने संख्या २२ झाली. त्यानंतर २० जुलै रोजी १२ डब्यांच्या आणखी १० फेऱ्यांचे १५ डब्यांत रुपांतर करण्यात आले आणि संख्या ३२ वर पोहोचली. आता आणखी २२ फेऱ्यांमुळे ही संख्या ५४ वर जाणार आहे.

Maharashtra TimesNavi Mumbai CIDCO: सिडकोची खरडपट्टी; आसूडगाव जमीन प्रकरणात भरपाई देण्यातील दिरंगाईबद्दल न्यायालयाची तीव्र नाराजीसीएसएमटी ते कर्जत-खोपोलीदरम्यान १५ डबा गाड्या चालवण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. आता सीएसएमटी ते टिटवाळा, आसनगाव, कसारादरम्यान लोकल फेऱ्यांची क्षमता वाढविणे गरजेचे आहे. पुढील महिन्यात या मार्गावर १५ डबा चालविण्याचे आश्वासन मिळाले आहे. तसे न झाल्यास जन आंदोलन छेडण्यात येईल. –राजेश घनघाव, अध्यक्ष, कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटना

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा