लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर शिर्डीच्या लॉजमध्ये वारंवार अत्याचार:गर्भवती राहिल्यानंतर प्रेयसीचा नंबर ब्लॉक, विरगाव पोलिसांत गुन्हा दाखल
इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीचे प्रेमसंबंधात रूपांतर करून लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित तरुणी गर्भवती झाल्यानंतर आरोपीने लग्नास नकार देत तिचा मोबाइल क्रमांकही ब्लॉक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी विरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटना शिर्डी हद्दीत घडल्याने पुढील तपासासाठी प्रकरण शिर्डी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे….
