Headlines

Cabinet Meetings: मंत्रिबैठकीचा ‘महाराजा’ थाट! एअर इंडिया इमारतीत लवकरच मंत्र्यांची दालने हलवणार, 22व्या मजल्यावर होणार मसलती – cabinet meetings will now be held at air india building at nariman point


Cabinet Meetings: मंत्रिमंडळ समिती कक्षाचे काम पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री, मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या महत्त्वाच्या बैठका या ठिकाणी होणार आहेत.

cabinet
कॅबिनेट(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
मुंबई : बाविसाव्या मजल्यावरून दिसणारा अथांग समुद्र, त्यासोबत लाटांची निरंतर गाज, अविरत वाहणारा वारा यांच्या साथीने राज्याच्या महत्त्वाच्या विषयांवर मसलती… राणीचा हार म्हणून सुपरिचित असलेल्या नरिमन पॉइंट येथील एअर इंडिया इमारतीत आता मंत्रिमंडळाच्या बैठका ‘महाराजा’ थाटात होणार आहेत.

राज्य सरकारने जवळपास १६०० कोटी रुपये खर्चून केंद्राकडून एअर इंडिया इमारत घेतली आहे. या ठिकाणी कार्यालय मिळावे यासाठी मंत्रालयातील अनेक वरिष्ठ अधिकारी वाट बघत आहेत. अथांग समुद्राची साथ लाभलेल्या या इमारतीत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी आणि इतर महत्त्वाच्या बैठकांसाठी मंत्रिमंडळ समिती कक्ष उभारण्यात येणार आहे. इमारतीच्या २२व्या मजल्यावर या कक्षाचे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूत्रांनी दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाने या इमारतीचे पाहणी पूर्ण केली असून लवकरच याठिकाणी राज्य सरकारच्या काही विभागांची कार्यालये स्थलांतरित करण्यात येणार आहे.

Maharashtra TimesLocal Body Election: राज्यात पुन्हा निवडणुकीचं बिगुल वाजणार! प्रलंबित जिल्हा परिषद, नगर पंचायत, ग्रामपंचायतींसाठी होणार मतदान
याशिवाय या इमारतीच्या २२व्या मजल्यावर मंत्रिमंडळाच्या नियमित बैठका, विविध मंत्रिमंडळ उपसमित्यांच्या बैठकांसह महत्त्वाच्या उच्चस्तरीय शासकीय बैठका याच कक्षात घेण्याचे नियोजन आहे. त्यानुसार २२व्या मजल्यावरील जागेचे अंतर्गत बांधकाम, ध्वनी व्यवस्था, अत्याधुनिक व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुविधा, डिजिटल सादरीकरणासाठी आवश्यक यंत्रणा आणि सुरक्षा व्यवस्थेची उभारणी सुरू झाली आहे. बैठकीदरम्यान गोपनीयता आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेले सर्व निकष पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.

प्रशासकीय कामकाज गतिमान होणार
एअर इंडिया इमारत राज्य सरकारच्या ताब्यात आल्यानंतर मंत्रालयावरील जागेचा ताण कमी करण्यासाठी विविध विभागांची कार्यालये टप्प्याटप्प्याने येथे स्थलांतरित करण्याचाही आराखडा तयार करण्यात येत आहे. त्यामुळे मंत्रालयातील जागेची कमतरता दूर होण्याबरोबरच प्रशासकीय कामकाज अधिक सुसूत्र आणि गतिमान होईल, अशी अपेक्षा आहे. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही या इमारतीत कार्यालय मिळण्याबाबत उत्सुकता दर्शविली आहे.
Maharashtra TimesAditya Thackeray: गाडी-बंगल्याची मागणी, आदित्य ठाकरेंनी भाजप-शिंदेंना कोंडीत पकडलं; मुख्यमंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी
या विभागांना कार्यालये
मुख्यमंत्री कार्यालयासह आरोग्य भवन, ग्रामविकास विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, – परिवहन आयुक्तालय, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मत्स्यव्यवसाय आयुक्तालय यासारख्या अनेक विभागांना याठिकाणी कार्यालये देण्यात येणार आहेत. यासंदर्भात अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याचे समजते.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा