Traffic jam Pune Video: पुण्यातील एन.डी.ए. रस्त्यावर दोन बैलांच्या झुंजीमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली आणि नागरिकांना बाईक सोडून पळावं लागलं. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

…अन् बैलांना पाहून लोक पळाले
हा व्हिडीओ pawarofcomedy या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पुण्यातील एन.डी.ए. रस्त्यावर दुपारी दोनच्या सुमारास घडली. दोन बैल हाणामारी करत रस्त्याच्या मधोमध आले आणि त्यांच्या भांडणामुळे ट्रॅफिक जॅम झालं. ते दोघे इतक्या त्वेषानं लढत होते की, त्यांना रोखण्यासाठी कोणाचीही पुढे जाण्याची हिंमत होत नव्हती. दोन बाईकस्वार तर आपापल्या बाईक तिथेच सोडून रस्त्याच्या कडेला पळून गेले. दरम्यान, आजूबाजूच्या लोकांनी हा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आणि आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पुण्यातील ट्रॅफिकची समस्या गंभीर
हा व्हिडीओ २५ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसेच, अनेकांनी हसणारे इमोजी शेअर करत त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र, पुण्यातील ट्रॅफिक ही एक गंभीर समस्या आहे. या समस्येवर प्रशासनानं योग्य तो मार्ग काढावा, यासाठी स्थानिक नागरिक वेळोवेळी आवाज उठवत असतात.
(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

