Headlines

Buldhana Vrushali Gawande Death Case Husband Prakash gave Supari to kill Crime News; बायकोच्या बॉडीजवळ रडत बसला, पोलीसही चुटपुटले, तपासात सुपारी अँगल समोर, वृषाली गावंडेंच्या घातपातामागील थरारक प्रकार


Vrushali Gawande Case : तीन वेळा जेवणातून विषारी औषध देऊन आरोपीने वृषाली यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न याआधीही केल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे.

Buldana Murder Case Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात पेसोडा फाट्यावर झालेल्या अपघातात शिक्षिका वृषाली गावंडे यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. प्रथमदर्शनी अपघात वाटणारा हा प्रकार पोलिस तपासात घातपात असल्याचं समोर आलं आहे. सुपारी देऊन पत्नीची हत्या केल्याप्रकरणी पतीसह दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पोलीस अपघातस्थळी पोहोचले तेव्हा पती प्रकाश गावंडे पत्नीच्या बॉडीशेजारी बसून रडत असल्याने अनेक जण भुलले होते. याआधी तीन वेळा जेवणातून विषारी औषध देऊन आरोपीने वृषाली यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे.

काय आहे प्रकरण?

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात पातुर्डा गावात चित्रपटांपेक्षाही थरारक प्रकार समोर आला आहे. पांढऱ्या रंगाच्या ‘टाटा इंट्रा’ गाडीने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार शिक्षिका वृषाली गावंडे यांचा अपघाती मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. मात्र पती प्रकाश उर्फ भय्या गावंडे याने शेगाव येथील मालवाहू वाहनाचा चालक मनीष नारायणसिंग सूर्यवंशी याला एक लाख रुपयांची सुपारी देऊन त्याने पत्नीची हत्या घडवून आणल्याचा प्रकार पोलीस तपासात समोर आला. प्रकाश गावंडे आणि मनीष सूर्यवंशी यांना पोलिसांनी अटक केली आहे.

अपघाताचा बनाव

संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील रहिवासी वैशाली प्रकाश गावंडे या जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत होत्या. दोन मार्च रोजी कवठळ रोडवर पेसोडा फाट्याच्या पुढे त्यांना अपघात झाला. अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरु केला होता, परंतु शिक्षिकेचे माहेर असलेल्या जस्तगाव परिसरात हा अपघात नसून घातपात असल्याची चर्चा सुरु झाली होती.
Maharashtra TimesSolapur Crime : बाथरुममध्ये सिगरेटची 18 थोटकं, खिशात मराठी चिठ्ठी, डॉ. शिरीष वळसंगकर मृत्यू प्रकरणाचं गूढ कायम

एक लाखांची सुपारी

भीषण अपघाताच्या नावाखाली दडलेला खुनाचा थरारक कट उघडकीस आणण्यात जळगाव जामोद पोलिसांना मोठं यश आलं. अपघात वाटणारी घटना प्रत्यक्षात १ लाख रुपयांची सुपारी देऊन घडवून आणलेला खून असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीदारांच्या मदतीने तपास केला असता संशयाची सुई पांढऱ्या रंगाच्या टाटा इंट्रा (एमएच २८ बीबी ५७५३) गाडीकडे वळली. ही गाडी मनीष सुर्यवंशीची असल्याचे समजताच त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली, तेव्हा मनीषने या थरारक कटाची कबुली दिली.
Maharashtra TimesCrime News : पुण्यातील तरुणीशी इन्स्टावर जुळलं, कुटुंबामुळे ब्रेकअप झाल्याचा समज, युवकाने जुळ्या बहिणीला निर्दयपणे संपवलं

तीन वेळा जीवे मारण्याचा प्रयत्न

मुख्य सूत्रधार हा वृषाली यांचा पती प्रकाश अनंता गावंडे आणि त्याचा साथीदार मंगेश चुलकार , राहणार पातुर्डा असल्याचे मनीषने सांगितले. वृषाली यांना अन्नातून विष देऊ मारण्याचा तीन वेळा प्रयत्न झाला होता, मात्र तो यशस्वी झाला नसल्याचे धक्कादायक वास्तव पोलीस तपासात समोर आले. आरोपींनी मनीष सुर्यवंशीला वृषाली यांना गाडीने उडवण्यासाठी १ लाख रुपयांची सुपारी दिली होती. ठरल्याप्रमाणे २ मार्चच्या सकाळी मनीषने वृषाली यांच्या गाडीचा पाठलाग केला आणि मागून कट मारुन त्यांना खाली पाडले, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा