Headlines

Buldhana 39 Year Old Man Ended Life After Call to Mother and Brother; ‘आई, हा माझा तुला शेवटचा फोन’; शेतात पोहोचताच माऊलीच्या डोळ्यासमोर पोटच्या गोळ्यानं आयुष्य संपवलं, कुटुंबाचा आक्रोश


Buldhana Crime News : ज्ञानेश्वर यांनी आपल्या आईला फोन केला आणि हा आपला शेवटचा संवाद असल्याचं सांगितले. ‘आई, हा माझा तुला शेवटचा फोन आहे…’ असं ते आईला कॉलवर बोलले.

39 Year old man Ended Life Call Mother
आईला कॉल मुलाची आत्महत्या(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
: बुलढाण्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आईला अखेरचा कॉल तरुण एका तरुणाने आपली जीवनयात्रा संपवल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना बुलढाण्यामध्ये घडली आहे. ‘आई…हा अखेरचा फोन आहे’, असं म्हणत मुलाने आपल्या जन्मदातीला कॉल केला अन् गळफास घेत आयुष्य संपवलं. ज्ञानेश्वर एकनाथ सपकाळ (वय 39) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

‘आई…हा शेवटचा फोन…’

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ‘आई…हा माझा तुला शेवटचा फोन आहे’ हे ऐकताच पोटचा गोळा काहीतरी विपरीत पाऊल उचलतोय हे लक्षात येताच आई आणि भावाने शेताकडे धाव घेतली. त्यावेळी मोबाइलवर त्यांचं बोलणं सुरूच होतं. पण डोळ्यादेखत आपल्या मुलाला मृत्यूला कवटाळताना पाहण्याची दुर्दैवी वेळ एका माऊलीवर आली. करडी ता. बुलढाणा येथील रहिवासी असलेले मृत ज्ञानेश्वर एकनाथ सपकाळ यांचे धाड येथील भाग 1 गट क्र. 57 मध्ये शेत आहे. 2 मार्च सोमवारी रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर यांनी टोकाचं पाऊल उचललं. गळफास घेण्यापूर्वी त्यांनी आपल्या आईला फोन केला आणि हा आपला शेवटचा संवाद असल्याचं सांगितलं.
Maharashtra TimesPune Accident Shiv Jayanti : शिवज्योत घेऊन धावणाऱ्या तरुणांना भरधाव कारची धडक, पुण्यातील दोन शिवभक्तांचा जागीच करुण अंत

आई आणि भाऊ येताना दिसताच…

ज्ञानेश्वर यांचा फोन येताच अनर्थ घडणार हे ओळखून त्यांची आई आणि भाऊ तातडीने शेताच्या दिशेने धावले. ते शेतात पोहोचले तेव्हा ज्ञानेश्वर यांचा फोन सुरूच होता. समोरून आई आणि भाऊ येताना दिसताच, ज्ञानेश्वर यांनी आंब्याच्या झाडाला बांधलेल्या नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आपलं आयुष्य. काही क्षणातच त्यांची प्राणज्योत मालवली. आई आणि भावाच्या डोळ्यादेखत हा काळीज पिळवटून टाकणारा प्रकार घडला.
Maharashtra TimesSukhoi Crash : वायुसेनेचं लढाऊ सुखोई विमान कोसळलं, फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकरांसह दोघा वैमानिकांनी प्राण गमावले
या घटनेची माहिती मिळताच धाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी धाड येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना केला. ज्ञानेश्वर यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा आणि भाऊ असा मोठा आप्त परिवार आहे. या प्रकरणी रघुनाथ पांडुरंग सपकाळ यांनी धाड पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. त्यांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही. गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार श्रीकृष्ण चव्हाण हे करत आहेत.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा