अकोट नगरपालिकेत भाजप आणि एमआयएमच्या युतीने देशभरात खळबळ उडाली. भाजपच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या अनैसर्गिक युतीमुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याचे सांगत प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आमदार प्रकाश भारसाखळे यांना खुलासा मागितला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अकोला: अकोट नगरपालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भाजपनं थेट एमआयएमशी युती केली. बटेंगे तो कटेंगेची घोषणा देणाऱ्या भाजपनं थेट एमआयएमशी युती केल्याचे तीव्र पडसाद उमटले. याची चर्चा देशभरात झाली. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य करत नाराजी बोलून दाखवली. कारवाईचे संकेत दिले. यानंतर आता एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे.
अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेत भाजप-एमआयएमची युती झाल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. भाजपचं हिंदुत्त्व गेलं कुठे, असा प्रश्न विचारला जाऊ लागला. सत्तेसाठी पक्ष कोणत्याही पातळीला जात लागल्याची खंत निष्ठावंत व्यक्त करु लागले. अनैसर्गिक युतीची चर्चा देशभरात झाली. या सगळ्यामुळे भाजपची प्रतिमा डागाळली. त्यामुळे भाजपनं अकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाखळे यांना पत्र लिहून खुलासा करण्याच्या सूचना केल्या आहेत. कसली तत्त्वं? सत्तेला महत्त्व! काँग्रेस-भाजप एकत्र, सुत्रं फिरली, युती तुटली; शिंदेसेना लाभार्थी ‘नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत २०२५ मध्ये आपण अकोट नगर परिषदेमध्ये एमआयएम सोबत युती करुन भारतीय जनता पक्षाच्या ध्येय धोरणाला सुरंग लावला आहे. तसेच असे करीत असताना कोणालाही विश्वासात न घेता आपल्या कृतीतून पक्षाची प्रतिमा मलीन झाली आहे. आपल्यावर कारवाई का करण्यात येऊ नये याबाबत आपण तातडीने खुलासा करावा,’ अशा सूचना आमदार प्रकाश भारसाखळे यांना पत्रातून करण्यात आल्या आहेत. या पत्रावर प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची स्वाक्षरी आहे.
भाजप नं अकोट नगर पंचायतीत सत्ता मिळवण्यासाठी एमआयएमला सोबत घेत ‘अकोट विकास मंचा’ची स्थापना केली. विशेष म्हणजे या विकास मंचात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत विरोधी पक्षातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बच्च कडू यांच्या प्रहार पक्षाचादेखील समावेश करण्यात आला. त्यामुळे या आघाडीबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. या आघाडीचं गटनेते भाजप आमदार रवी ठाकूर यांच्याकडे देण्यात आलं. भाजप-काँग्रेसची युती, पहिली विकेट पडली; प्रदेशाध्यक्षांनी फर्मान काढलं, मोठी कारवाई दुसरीकडे अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेस ची युती झाली. शिंदसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप आणि काँग्रेसची हातमिळवणी झाली. या विचित्र युतीची चर्चादेखील देशभरात झाली. यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांची हकालपट्टी केली. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. सोबतच भाजप सोबत युती करणाऱ्या काँग्रेसच्या १२ नगरसेवकांचंही निलंबन करण्यात आलं. एकीकडे काँग्रेसनं थेट निलंबनाची कारवाई केलेली आहे. तर दुसरीकडे भाजपनं कारणे दाखवा नोटिस बजावलेली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कठोर कारवाईची जोरदार चर्चा आहे.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.
पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.
मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.
‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.
टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.
लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.
लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.
२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.
शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा