Viral Protest Video: नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधातील आंदोलनादरम्यान बिहारमधील काही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. हे व्हिडीओ पाहून तुम्ही देखील डोक्याला हातच लावाल

लोकांना रोखणार कसं?
उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकं अनोखी आहेत, असं म्हटलं जातं. कारण इतर राज्यांमध्ये लोकांच्या घरातील मौल्यवान वस्तू चोरीला जातात. पण इथे नदीवरील पूल, नव्याने बांधलेले रस्ते, रेल्वेचे रूळ, पोलिसांच्या गाड्या अशा अनेक गोष्टी चोरीला गेल्याच्या घटना चर्चेत आल्या आहेत. हीच गोष्ट विद्यार्थी आंदोलनातही पाहायला मिळाली. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी बॅरिकेड्स लावले होते. मात्र, आंदोलक तेच बॅरिकेड्स घेऊन पळाले. त्यानंतर आंदोलकांना पांगवण्यासाठी पाण्याचे फवारे सोडण्यात आले. पण उलट लोक रेन डान्स करू लागले.
पोलिसांच्या काठ्या, हेल्मेट आणि शिल्डही नेले
पोलिसांनी दोरीचा वापर केल्यानंतर जणू रस्सीखेच स्पर्धाच सुरू झाली. याशिवाय काही आंदोलकांनी पोलिसांच्या काठ्या, हेल्मेट आणि शिल्डही घेऊन पळ काढल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. वास्तविक हा प्रकार गंभीर आहे. किंबहुना, विद्यार्थ्यांचं आंदोलन हा मुळातच एक गंभीर मुद्दा आहे. मात्र, ज्या गोष्टींसाठी बिहारवर कायम टीका केली जाते, त्याच गोष्टी आता आंदोलनाच्या निमित्ताने इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरत आहेत. असो, हे व्हायरल व्हिडिओ पाहून तुमच्या मनात काय विचार आले? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.
(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

