Headlines

Bangalore Pothole Horror Tanker Crushes Bike While Dodging Potholes Rider Narrowly Escapes | खड्डा चुकवताना टँकरनं बाईक चिरडली; जीव वाचवण्यासाठी तरुणानं मारली उडी, धडकी भरवणारा व्हिडीओ व्हायरल


Viral Accident Video: बेंगळुरूमधील खराब रस्ते आणि खड्ड्यांमुळे झालेल्या धक्कादायक अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. खड्डे चुकवताना पाण्याच्या टँकरने एका बाईकला चिरडलं, मात्र चालकानं वेळीच उडी घेतल्याने त्याचा जीव वाचला.

Bangalore Pothole Accident
(फोटो सौजन्य – @BefittingFacts/x.com)
रस्त्यावरील खड्डे हे जणू भारतीयांच्या पाचवीलाच पुजले आहेत. कारण अत्याधुनिक तंत्रज्ञान आल्यानंतरही खड्ड्यांची समस्या काही सुटलेली नाही. बरं, पावसाळा सुरू झाला की खड्ड्यांची समस्या आणखी प्रभावीपणे जाणवते. कारण या खड्ड्यांमध्ये पाणी साचतं आणि मग अपघात होण्याची शक्यता आणखी वाढते. असो, पण याच पार्श्वभूमीवर एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. एक टँकर चालक रस्त्यावरील खड्डा चुकवत पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता. पण या नादात त्यानं एका बाईकचा पार चक्काचूर केला. हा पाण्याचा टँकर बाईकला तुडवून पुढे गेला. हा व्हिडीओ पाहून खरंच तुम्ही देखील अवाक् व्हाल.

कसा झाला अपघात?

हा व्हिडीओ @BefittingFacts या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बेंगळुरूमध्ये घडली आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, अत्यंत खराब रस्त्यावरून वाहनं धावत आहेत. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून त्यामध्ये पाणी साचलं आहे. दरम्यान, एक पाण्याचा टँकर खड्डे चुकवत पुढे जात होता. पण या नादात चालकानं शेजारी चालत असलेल्या बाईकचा चुराडा केला. हा टँकर थेट बाईकवरून गेला. सुदैवानं बाईक चालवणाऱ्या तरुणानं लगेच उडी घेतली, म्हणून त्याचा जीव वाचला. अन्यथा टँकरचं चाक त्याच्याही अंगावरून गेलं असतं.

हा व्हिडीओ होतोय व्हायरल

हा धडकी भरवणारा व्हिडीओ आतापर्यंत २ लाख ६५ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसंच, ३०० हून अधिक नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत खराब रस्त्यांप्रकरणी संताप व्यक्त केलाय. असो, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातही शाळेतल्या मुलांनी रस्त्यांवरील खड्ड्यांप्रकरणी व्हिडीओ तयार केले होते. त्यानंतर आता ठिकठिकाणी रस्ते दुरुस्त करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. या अपघाताप्रकरणी तुमचं काय मत आहे? तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया द्या.

(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा