Headlines

Bala Nandgaonkar Post on Uddhav Thackeray Birthday shares old Photos with Aaditya Thackeray; उद्धवजी, रश्मी वहिनी, आदित्य माझ्या लेकीच्या बर्थडेला आलेले, ‘मित्रपक्षा’तील नेत्याची ठाकरेंच्या वाढदिवशी पोस्ट; म्हणतात, देशाला दिशा दाखवणारी ताकद


Bala Nandgaonkar on Uddhav Thackeray : कोणे एके काळी उद्धव ठाकरेंशी मैत्र असलेल्या मनसेतील नेत्यांनाही उघडपणे शुभेच्छा देण्याची संधी मिळाली आहे. राज ठाकरेंचे निकटवर्तीय आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी उद्धव ठाकरेंसोबतचे फोटो शेअर करत सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

Uddhav Thackeray Birthday Bala Nandgaonkar Post Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज (२७ जुलै) वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राजकीय वर्तुळातील अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उबाठा या दोन पक्षांमधील दुरावा अनेक वर्षांनी मिटला आहे. त्यामुळे कोणे एके काळी उद्धव ठाकरेंशी मैत्र असलेल्या मनसेतील नेत्यांनाही उघडपणे शुभेच्छा देण्याची संधी मिळाली आहे. राज ठाकरेंचे निकटवर्तीय आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी उद्धव ठाकरेंसोबतचे नवे जुने फोटो शेअर करत सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

बाळा नांदगावकर यांची पोस्ट काय?

सालस आणि सहृदयी. सध्या राजकारणाने अतिशय खालची पातळी गाठली असताना आणि वैयक्तिक द्वेषाचे राजकारण होत असताना उद्धव ठाकरे म्हणजे सुसंस्कृत राजकारण कसे करावे याचे उत्तम उदाहरण.

माननीय बाळासाहेबांचे चिरंजीव ही गुडविल त्यांच्या पाठीशी असली तरी नंतर त्यांनी स्वतःला वारंवार सिद्ध केले. शिवसेना आणि शिवसैनिक यांचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाते असते हे बाळासाहेबांपासून चे नाते उद्धव साहेब यांनीही जोपासले.

अडथळ्यांशिवाय गती नाही आणि धोक्याशिवाय प्रगती नाही याप्रमाणे अनेक अडथळे आणि धोक्यांवर मात करून यशस्वी राजकारण करून दाखवले. हे करताना त्यांनी कायमच त्यांची संयमाची भूमिका आवर्जून सांभाळली.
Maharashtra TimesNashik Accident : अंत्यविधींना जाताना काळाचा घाला, नवदाम्पत्याचा करुण अंत, लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यात एकत्रच शेवट

कलेवर अधिपत्य असलेले ठाकरे

हे सगळे करताना त्यांनी त्यांच्यातील सहृदयी पणा अजूनही टिकवून ठेवला हे विशेष. ठाकरे म्हणजे कलेवर अधिपत्य असलेला परिवार. ते बाळासाहेब असो, राजसाहेब असो किंवा उद्धवसाहेब. उद्धव साहेब हे उत्कृष्ट असे फोटोग्राफर आहेत. ही कला त्यांनी अजूनही जोपासली आहे.

जितेंद्र आव्हाड-एकनाथ शिंदे एकाच मंचावर; भर कार्यक्रमात जुगलबंदी रंगली

ठाकरेंमधला घरंदाज राजकारणी

माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर पूर्ण ठाकरे परिवाराचे कायमच प्रेम राहिले आहे. अनेकदा उद्धव साहेबांबरोबर राज्यात एकत्र प्रवास करताना त्यांचा स्वभाव जवळून अनुभवता आला. तेव्हाच त्यांच्यातील घरंदाज राजकारणी मला कळाला. ठाकरेंची तिसरी पिढी ही माझ्यावर असेच प्रेम करत आहे त्यामुळे मी कायमच या सर्वांचा ऋणी आहे.
Maharashtra TimesArchita Rahar : प्रधानांचा राजीनामा, भाजप खासदाराच्या कन्येची आनंदात इन्स्टा पोस्ट, डिलीट करण्याची सूचना मिळताच म्हणाली, आता आईला फोन करतील

लेकीच्या वाढदिवशी उद्धव ठाकरे आलेले

माझी मुलगी सृष्टी हिच्या पहिल्या वाढदिवसाला उद्धव साहेब, रश्मी वहिनी आणि आदित्य हे आवर्जून आले होते. आज तो फोटो ही तुमच्याबरोबर शेयर करत आहे. जुने फोटो म्हणजे एक प्रकारचा चांगल्या क्षणांचा खजिनाच आहे.

देशाला दिशा दाखवणारी ताकद

उद्धव साहेब आणि राज साहेब एकत्र आल्याने जी ताकद बनली आहे ती येणाऱ्या काळात राज्याला नव्हे देशाला दिशा दाखवणारी ताकद असेल. उद्धव साहेबांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा