‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ समितीची राज्यपालांशी चर्चा
त.भा. प्रतिनिधी पणजी : देशात ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ ही संकल्पना राबवण्याच्या दृष्टीने देशभरात सुरू असलेल्या प्रक्रियेचा भाग म्हणून संयुक्त संसदीय समितीने गोव्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांची दोनापावला येथील ‘लोक भवन’ येथे सदिच्छा भेट घेतली. समितीच्या दोन दिवसीय गोवा अभ्यास दौऱ्याच्या सांगतेच्या निमित्ताने या महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीदरम्यान…
