बांकेबिहारी मंदिरात महिला शिपायाने भाविकाला मारहाण केली:धक्का लागल्याने संतापली, रांगेतून ओढून चापटी मारल्या, आई म्हणत राहिली- सोडून द्या
मथुरा येथील बांके बिहारी मंदिरात धक्का लागल्यानंतर एका महिला शिपायाने भाविक तरुणाला बेदम मारहाण केली. संतप्त शिपायाने तरुणाचा टी-शर्ट पकडून त्याला रांगेतून बाहेर ओढले आणि सटासट कानशिलात लगावले. 25 सेकंदात त्याला 8 चापटी मारल्या. मुलाला मारहाण होताना पाहून आई रडत ओरडत राहिली, “मारू नका, तो मरून जाईल.” आजूबाजूचे लोक मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत राहिले, पण…
